‘त्या’ पाचजणांबाबत पक्षच निर्णय घेईल

By admin | Published: June 16, 2016 10:59 PM2016-06-16T22:59:30+5:302016-06-17T00:47:49+5:30

उदय सामंत : नाचणेतील नाराज सदस्यांबाबत स्पष्टोक्ती

The decision will be taken by the parties regarding the five people | ‘त्या’ पाचजणांबाबत पक्षच निर्णय घेईल

‘त्या’ पाचजणांबाबत पक्षच निर्णय घेईल

Next

रत्नागिरी : नाचणे उपसरपंच निवडणुकीनंतर सेनेच्या ‘त्या’ पाच सदस्यांनी आपण वेगळी भूमिका लवकरच जाहीर करू, असे म्हटल्याचे वाचनात आले. ते शिवसैनिकच आहेत. त्यांची भूमिका आपण नक्की जाणून घेऊ. मात्र, त्यांची वेगळी भूमिका वा वेगळा निर्णय असेल तर त्यांच्याबाबत पक्ष योग्य निर्णय घेईल, अशी माहिती आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत उदय सामंत यांनी सांगितले की, आपण शिवसेनेत दाखल झाल्यापासून आत्तापर्यंत सेनेत नवा-जुना वाद असल्याचे सातत्याने वाचनात येत आहे. मात्र, असा कोणताही वाद सेनेत नाही. सर्व शिवसैनिक एकदिलाने काम करत आहेत. पक्षात काम करताना काहीजण नाराज असू शकतात. अशांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सातत्याने पक्षात होत असतात. फणसोपची निवडणूक व नाचणे उपसरपंच निवडणूक हे दोन वेगळे विषय आहेत, असे सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले. रत्नागिरी शहर एलईडीने झगमगल्याचा मलाही आनंद आहे. या प्रकल्पाचे स्वागत आहे. मात्र, या प्रकल्पासाठी जिल्हा नियोजनने नगरोत्थानमधून निधी मंजूर करून दिला. याचे सर्व श्रेय तत्कालिन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना जाते. त्यांनी या योजनेचा घोळ सोडवून निधीची व्यवस्था केली नसती तर एलईडी प्रकल्प अडचणीत आला असता, असेही सामंत म्हणाले. (प्रतिनिधी)


विकासकामे सहकार्यातून : पाणी योजनेत ५० त्रुटी
पालिकेच्या ६८.४० कोटी खर्चाच्या प्रस्तावित वाढीव नळपाणी योजनेच्या प्रस्तावात संबंधित शासकीय समितीने ५० त्रुटी काढल्या आहेत. योजनेचा प्रस्ताव बनविणारे जीवन प्राधिकरणचे अधिकारी मुल्ला यांचीही बदली झाली आहे. योजनेच्या सादरीकरणाबाबत राजकारण करणाऱ्यांना आता आपण यात का लक्ष घातले होते हे लक्षात येईल. विकासकामे ही सर्वांच्या सहकार्यातूनच साध्य होतात. त्यामुळे रत्नागिरीची पाणी योजनाही त्रुटी दूर केल्यानंतर नक्की होईल, असे त्यांनी सांगितले.

समर्थक नाहीत...
शिवसेनेत माझ्याबरोबर आलेले सर्वजण शिवसैनिक म्हणूनच काम करत आहेत. माझ्यासमवेत आलेले कोणीही माझे समर्थक म्हणून काम करत नसल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. त्यामुळे त्यांना आमदार समर्थक म्हणून म्हणणे चुकीचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: The decision will be taken by the parties regarding the five people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.