रेशन दुकानदारांना फ्रंटलाइन वर्कर्स घोषित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:42 AM2021-06-16T04:42:29+5:302021-06-16T04:42:29+5:30

चिपळूण : कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन रेशन दुकानदारांना स्वत:चा अंगठा वापरून, पॉस मशीनद्वारे धान्य वाटप करण्यास संघटनेतर्फे मागणी करण्यात ...

Declare ration shopkeepers as frontline workers | रेशन दुकानदारांना फ्रंटलाइन वर्कर्स घोषित करा

रेशन दुकानदारांना फ्रंटलाइन वर्कर्स घोषित करा

Next

चिपळूण : कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन रेशन दुकानदारांना स्वत:चा अंगठा वापरून, पॉस मशीनद्वारे धान्य वाटप करण्यास संघटनेतर्फे मागणी करण्यात आली होती. मात्र, ही मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही, तसेच अन्य मागण्याही करण्यात आल्या होत्या. त्याकडेही शासनाने दुर्लक्ष केले आहे. रेशन दुकानदारांना फ्रंटलाइन वर्कर्स घोषित करून, सोईसुविधा उपलब्ध करण्यास शासनाला नेमकी कोणती अडचण आहे, असा प्रश्न जिल्हा रेशनिंग दुकानदार केरोसीन मालक-चालक संघटनेचे अध्यक्ष अशोक कदम यांनी उपस्थित केला आहे.

याविषयी जिल्हाधिकारी व पुरवठा अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

रत्नागिरी जिल्हा करोनाचा महामारीमध्ये रेड झोन म्हणून घोषित केलेला आहे. सर्व तालुक्यांतून ग्रामीण भागामध्ये व शहरी भागामध्ये कोरोना रुग्णांची संख्या आजही वाढत आहे. बऱ्याचशा ठिकाणी कंटेन्मेंट झोनही केलेले आहेत. अशा परिस्थितीत जो ग्राहक कोरोना रुग्ण म्हणून घोषित केलेला असेल, त्याला अन्नपुरवठा कायद्यान्वये धान्य देणे बंधनकारक असताना, धान्य दुकानदाराकडून त्याचा अंगठ्याचा ठसा घेऊन, त्याला धान्य वितरण केल्यास धान्य दुकानदार कोरोनाबाधित होईल व इतर ग्राहकांना त्याचा त्रास होईल. त्यामुळे धान्य दुकानदारांनी स्वत:च्या अंगठ्याआधारे पॉस मशीन वापरून धान्य वाटप करण्याला परवानगी मिळावी, अशी मागणी आपण केली होती. ती अद्याप मान्य न झाल्यामुळे निदान जिथे कंटेन्मेंट झोन आहे किंवा कोरोनाबाधित रुग्ण आहेत, तेथे ऑफलाइन धान्य वाटपाला परवानगी मिळावी व ते वाटप वारसाच्या अंगठ्याने अधिकृत करण्यात यावे. तसे न केल्यास जिल्ह्यामध्ये वितरण व्यवस्था हाताळताना, धान्य दुकानदार कोरोनाबाधित होऊन अडचणीत आले, तर त्याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल, असा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे.

Web Title: Declare ration shopkeepers as frontline workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.