तब्बल १४ दिवसांनी लांजातील काेराेना रुग्णांच्या संख्येत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:39 AM2021-07-07T04:39:52+5:302021-07-07T04:39:52+5:30
लांजा : गेल्या १४ दिवसांच्या कालावधीनंतर मंगळवारी कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट झाली. तालुक्यात मंगळवारी केवळ ७ कोरोनाचे रुग्ण ...
लांजा : गेल्या १४ दिवसांच्या कालावधीनंतर मंगळवारी कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट झाली. तालुक्यात मंगळवारी केवळ ७ कोरोनाचे रुग्ण आढळल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, एकाचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे. तालुक्यातील रुग्णांची संख्या ३३९४ झाली असून, ३०४७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
गेल्या चार महिन्यांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ हाेत आहे. मात्र, मंगळवारी कमी रुग्ण आढळल्याने तालुकावासीयांना दिलासा मिळाला. नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये अँटिजनचे ७ तर तहसील कार्यालय येथे कामानिमित्त आलेल्यांपैकी २ असे एकूण ९ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. आरटीपीसीआरमध्ये काेणीही पाॅझिटिव्ह आढळलेला नाही. तालुक्यात आढळलेल्या रुग्णांमध्ये लांजा - धावणेवाडी येथे २ तर वाकेड - मावळतवाडी, तळवडे - चौवसुपेवाडी, लांजा - शेवरवाडी, चाफेट - शिंदेवाडी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. सध्या तालुक्यात २३२ कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, तर ११५ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.