कंटेन्मेंट झोनच्या संख्येत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:36 AM2021-09-24T04:36:59+5:302021-09-24T04:36:59+5:30
खेड : शहरासह ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने आरोग्य यंत्रणेसह प्रशासकीय यंत्रणेने सुटकेचा निश्वास टाकला आहे. कोरोना ...
खेड : शहरासह ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने आरोग्य यंत्रणेसह प्रशासकीय यंत्रणेने सुटकेचा निश्वास टाकला आहे. कोरोना बाधित रुग्णांना कार्यान्वित कंटेन्मेंट झोनच्या संख्येतही घट झाली असून, आराेग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे.
निवारा शेडची दुरवस्था
राजापूर : तालुक्यातील मिलंद राववाडी एसटीच्या मार्ग निवाऱ्याची दुरवस्था झाली आहे. पाचल जवळेथर या मार्गावरील मिलंद राववाडी येथे तत्कालीन खासदार सुरेश प्रभू यांच्या स्थानिक विकास निधीतून मार्ग निवारा बांधण्यात आला होता. मार्ग निवारा शेडची तत्काळ दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.
रस्ता खचला
देवरूख : संगमेश्वर-कोल्हापूर मार्गावर संगमेश्वर नजीक लोवले बसथांब्याजवळ दोन्ही बाजूला गटार खचल्याने रस्ता धोकादायक बनला आहे. अपघातांची संख्या वाढल्यामुळे तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे. ग्रामपंचायतीने रस्ता दुरुस्तीबाबत पत्र देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
पुरस्कार जाहीर
देवरूख : साडवली येथील प्रीतेश मांगले याचा आर्ट बीट पुणे यांच्याकडून देण्यात येणारा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. प्रीतेश हा मेकॅनिकल इंजिनिअर असून, सध्या तो पुण्यामध्ये मल्टी नॅशनल कंपनीमध्ये कार्यरत आहे. विविध टाकाऊ वस्तू पासून विविध वस्तूंच्या, गाड्यांची हुबेहूब प्रतिकृती बनविण्यात प्रीतेशचा हातखंडा आहे.