व्यापाऱ्यांच्या clickinn ॲपचे उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:23 AM2021-06-18T04:23:04+5:302021-06-18T04:23:04+5:30
रत्नागिरी : कोरोनाच्या काळात सर्वच ठिकाणचा व्यापार बंद झाला असताना रत्नागिरीकरांसाठी अमेझाॅन आणि फ्लिप्कार्टसारखे ॲप सुरू करून इथल्या व्यापारी ...
रत्नागिरी : कोरोनाच्या काळात सर्वच ठिकाणचा व्यापार बंद झाला असताना रत्नागिरीकरांसाठी अमेझाॅन आणि फ्लिप्कार्टसारखे ॲप सुरू करून इथल्या व्यापारी आणि ग्राहकांची उत्तम सोय केल्याबद्दल क्लिक इन ॲप सुरू करणाऱ्या सॉफ्टवेयर इंजिनीअर राहुल भंडारे या तरुणाचं कौतुक राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी या ॲपचे ऑनलाइन उद्घाटन केले.
महावितरण कंपनीचे येथील जनसंपर्क अधिकारी संजय वैशंपायन यांच्या संकल्पनेतून आणि साॅफ्टवेअर इंजिनिअर राहुल भंडारे यांच्या अथक मेहनतीतून रत्नागिरीतील स्थानिक विविध व्यापारी यांच्याकडून ग्राहकांना आपल्याला हव्या असलेल्या वस्तुंची खरेदी करून त्या वस्तू घरपोच मिळणार आहेत. या ॲपचा लोकार्पण सोहळा गुरुवारी मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की,
सध्या कोरोना काळात दुकाने बंद असताना, व्यापार बंद असताना या ॲप ला फार महत्त्व आहे. व्यापाऱ्यांना त्याचा आधार असेल.
या ॲपमुळे स्थानिक व्यापाऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने विक्रीसाठी नवीन दालन खुले झाले आहे तसेच स्थानिक व्यापारी एका दिवसातच घरपोच सेवा अत्यंत रास्त दरात देऊ शकणार असल्याने ग्राहकांना अतिशय सोयीचे होणार आहे. Clickinn ॲप डाऊनलोड करण्यासाठी https://play.google.com/store/apps/details?id=mspiron.click.inn ही लिंक आहे.
या कार्यक्रमात ‘क्लिक इन’ वरून सर्वप्रथम खरेदी करणाऱ्या ग्राहकांना N95 मास्क आणि नारळपाणीचे पाऊच भेट म्हणून देण्यात येणार असल्याची घोषणा ॲंपचे राहुल भंडारे यांनी या कार्यक्रमात केली. या ॲपचा वापर ग्राहकांनी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.