कुंभारखाणी मधलीवाडीकडून ग्रामस्थांसाठी कुलर लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:32 AM2021-04-22T04:32:33+5:302021-04-22T04:32:33+5:30
देवरुख : थंड व स्वच्छ पाणी सर्वसामान्यांना मिळावे या उद्देशाने संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी बुद्रुक येथील मधलीवाडी ग्रामस्थांकडून नुकताच ...
देवरुख : थंड व स्वच्छ पाणी सर्वसामान्यांना मिळावे या उद्देशाने संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी बुद्रुक येथील मधलीवाडी ग्रामस्थांकडून नुकताच लोकवर्गणीतून कुलर लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला. त्याचा लोकार्पण सोहळा नुकताच करण्यात आला.
यावेळी माजी सभापती व सामाजिक कार्यकर्ते विकास सुर्वे, सरपंच गीता सुर्वे, उपरपंच अनिल सुर्वे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करून त्याचे लोकार्पण झाले. उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना थंड पाण्याचा दिलासा मिळावा, या सामाजिक जाणिवेतून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे विकास सुर्वे यांनी सांगितले. या कुलरचा अंदाजे रोज पाचशेहून अधिक लोकांना फायदा होईल. हा कुलर मध्यवर्ती ठिकाणी बसविण्यात आला असून, बसस्टँड, रेशन दुकान, ग्रामपंचायत, तसेच शाळा नजीक असल्याने व रहदारीच्या कुटगिरी, रातांबी, येगाव, राजीवली मार्गावर असल्याने त्याचा उपयोग प्रवाशांनाही होईल.
या कार्यक्रमाला कृष्णात सुर्वे, सचिन सुर्वे, सुजित सुर्वे, चंद्रकांत सुर्वे, अविनाश सुर्वे, राजू नारकर, महादेव सुर्वे, विजय सुर्वे, अरुणा सुर्वे, मानसी लाखन यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.