पावस कोविड केअर सेंटरचे रविवारी लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:33 IST2021-05-27T04:33:19+5:302021-05-27T04:33:19+5:30
रत्नागिरी : तालुक्यातील पावस येथील मजलिस -ए फलाने दारेन या मदरशामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी ‘पावस कोविड केअर सेंटर’ सुरू करण्यात ...

पावस कोविड केअर सेंटरचे रविवारी लोकार्पण
रत्नागिरी : तालुक्यातील पावस येथील मजलिस -ए फलाने दारेन या मदरशामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी ‘पावस कोविड केअर सेंटर’ सुरू करण्यात आले आहे. कोरोना रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी २० बेडचे रुग्णालय विविध सोयी-सुविधांनीयुक्त तयार करण्यात आले असून, त्याचा लाेकार्पण सोहळा रविवार, दि. ३० मे रोजी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याहस्ते करण्यात येणार असल्याची माहिती कोविड केअर सेंटरच्या कोअर कमिटीचे पदाधिकारी रफिक बिजापुरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढत असलेली संख्या लक्षात घेता, सामाजिक भावनेतून अरबी मदरसा बंद करून त्याठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. शासन व जिल्हा प्रशासनाच्या मान्यतेनुसार ग्रामीण भागातील कमी लक्षणे असलेल्या रुग्णांची सोय या केअर सेंटरमध्ये करण्यात आली आहे. शासनाच्या नियमावलीनुसार कमीत कमी दरात चांगली व उत्तम सेवा देण्याचा उद्देश आहे. याठिकाणी तज्ज्ञ डाॅक्टरांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल असलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी कँटिनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पत्रकार परिषदेसाठी मन्सूर काजी, एजाज खान, मौलाना शकूर खान आदी उपस्थित होते.