रामनाथ मोते यांच्या स्मारकाचे उद्या लाेकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:37 AM2021-09-04T04:37:55+5:302021-09-04T04:37:55+5:30
वाटूळ : कोकण विभागाचे शिक्षक आमदार रामनाथ मोते यांचे राज्यातील पहिले स्मारक राजापूर तालुक्यातील दत्तवाडी शाळेचे प्रांगणात उभे राहत ...
वाटूळ : कोकण विभागाचे शिक्षक आमदार रामनाथ मोते यांचे राज्यातील पहिले स्मारक राजापूर तालुक्यातील दत्तवाडी शाळेचे प्रांगणात उभे राहत आहे. या स्मारकाचा लाेकार्पण साेहळा ५ सप्टेंबर, २०२१ राेजी सकाळी १० ते १२ या वेळेत करण्यात येणार आहे.
स्मारकाचा लोकार्पण, तसेच गुणीजन शिक्षक पुरस्कार वितरण असा संयुक्त कार्यक्रम यावेळी हाेणार आहे. या कार्यक्रमाला पदवीधर आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार डॉ.विनय नातू, माजी आमदार बाळ माने, संस्थाध्यक्ष सुरेश जोशी, राज्याध्यक्ष सुधीर घागस उपस्थित राहणार आहेत. गतवर्षी रामनाथ मोते यांच्या दुर्दैवी निधनानंतर शिक्षण क्रांती संघटना कोकण विभाग अध्यक्ष रमेश जाधव यांनी शोकसभेत स्मारकाचा संकल्प केला होता. मोते यांचे रत्नागिरी जिल्ह्यावर असलेले विशेष प्रेम पाहता, हे स्मारक जिल्ह्यातच असावे, या विचाराने राजापूर तालुक्यातील दत्तवाडी येथे हे स्मारक उभे करण्यात आले आहे.
प्रतिवर्षी प्राथमिक शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले जाते. मात्र, माध्यमिक शिक्षकांना त्यातून वगळले जाते, ही खंत लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेतर्फे शिक्षक दिनाचे औचित्य साधत जिल्ह्यातील शिक्षकांना गुणीजन पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. या वर्षी राजापूर तालुक्यातून प्रमोद खरात-वाटूळ हायस्कूल, साधना कुलकर्णी-आडिवरे हायस्कूल, लांजा तालुक्यातून बाजीराव देवकाते-शिपोशी हायस्कूल, वृषाली काेत्रे-साठवली हायस्कूल, रत्नागिरीतून योगेश शेटे-हरचेरी हायस्कूल, मानसी विचारे-जयगड हायस्कूल, संगमेश्वरातून प्रकाश विरकर-बुरंबी हायस्कूल, सुप्रिया गार्डी-देवळे हायस्कूल, चिपळुणातून रत्नाकर मिसाळ-कळंबणी हायस्कूल, श्रेया दळवी-मार्ग ताम्हाने हायस्कूल, गुहागरातून अभय जोशी-वाघांबे हायस्कूल, दीपाली कांबळे-अंजनवेल हायस्कूल, खेडमधून दत्तात्रय जासूद-आसगे हायस्कूल, स्मिता सरदेसाई-लवेल हायस्कूल, दापोलीतून रियाज महिसले, भारती सावंत-करंजणी आणि मंडणगड तालुक्यातून मनोज चव्हाण यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील मोतेप्रेमी शिक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कोकण विभाग अध्यक्ष रमेश जाधव, स्मारक समिती निमंत्रक प्रसाद पणगेरकर, जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी, जिल्हा सचिव राहुल सप्रे, मुख्याध्यापक कामतेकर यांनी केले आहे.