कामथे रुग्णालयातील सेमी आयसीयू कोविड सेंटरचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:25 AM2021-05-30T04:25:31+5:302021-05-30T04:25:31+5:30
चिपळूण : येथील सागर कर्तव्य फाऊंडेशनतर्फे कामथे कोविड रुग्णालयातील आनंदी जोशी हॉलमध्ये सेमी आयसीयू वॉर्ड तयार करण्यात आला असून, ...
चिपळूण : येथील सागर कर्तव्य फाऊंडेशनतर्फे कामथे कोविड रुग्णालयातील आनंदी जोशी हॉलमध्ये सेमी आयसीयू वॉर्ड तयार करण्यात आला असून, शनिवारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या सेंटरचे लोकार्पण करण्यात आले.
जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या सूचनेनुसार सागर कर्तव्य फाऊंडेशनतर्फे वातानुकुलित सुसज्ज सेमी आयसीयू कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. रुग्णांना मानसिक समाधान लाभावे व आल्हाददायी वातावरण राहावे, यासाठी सकारात्मक संदेश देणारी चित्रे, सुमधूर संगीत अशी खास व्यवस्था करण्यात आली आहे. या आरोग्य सुविधांचे लोकार्पण रुग्णालयातील परिसेविका स्नेहा चौधरी, परिचारिका बजंत्री यांच्या हस्ते फीत कापून तर आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती रिया कांबळे, माजी सभापती शौकत मुकादम, जिल्हा परिषद सदस्य दिशा दाभोळकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, डॉ. प्रकाश पाटणकर, कामथे हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर. आर. भोई, डॉ. असित नरवडे, डॉ. संतोष हंकारे, डॉ. सतीश गवळे, आरपीआयचे राजू जाधव, संदेश मोहिते, नंदू थरवळ, शाहनवाज शाह, परेश पवार, रामशेठ रेडीज, रमण डांगे, वैभव निवाते, बापू साडविलकर, राजेंद्र खातू, किशोर कदम उपस्थित होते.