पारंपरिक मच्छीमारांचे शिष्टमंडळ आज अस्लम शेख यांना भेटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:19 AM2021-03-30T04:19:44+5:302021-03-30T04:19:44+5:30
दापोली : बेकायदेशीर एलईडी मासेमारीविराेधात कडक कायदा करण्याच्या मागणीसंदर्भात दापाेलीत मच्छीमारांचे साखळी उपाेषण सुरू आहे. या उपाेषणकर्त्यांची युवक काँग्रेसचे ...
दापोली : बेकायदेशीर एलईडी मासेमारीविराेधात कडक कायदा करण्याच्या मागणीसंदर्भात दापाेलीत मच्छीमारांचे साखळी उपाेषण सुरू आहे. या उपाेषणकर्त्यांची युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेनंतर पारंपरिक मच्छीमार बांधवांचे शिष्टमंडळ जिल्हा काँग्रेस कमिटीसोबत पुन्हा एकदा मत्स्य उद्योगमंत्री अस्लम शेख यांची भेट घेणार आहे.
मत्स्य उद्योगमंत्री अस्लम शेख यांची गुरुवारी पारंपरिक मच्छीमारांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती. या भेटीत अस्लम शेख यांनी एक महिन्याच्या कालावधीत आपण योग्य ती कारवाई करू, असे सांगितले होते, परंतु त्यानंतरही पारंपरिक मच्छीमारांचे साखळी उपोषण सुरूच आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तांबे यांनी पारंपरिक मच्छीमारांच्या साखळी उपोषणला भेट देऊन चर्चा केली हाेती. त्या भेटीअंती मत्स्य उद्योगमंत्री अस्लम शेख यांच्याशी बैठक लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यानुसार, मंगळवारी ३० तारखेला १२ वाजता ही बैठक हाेणार आहे.
युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश अनंत मोहिते, जिल्हाध्यक्ष विजय भोसले, राजेंद्र नागू चौगुले, नंदकुमार गोपीचंद चौगुले, शावेज शहाबुद्दीन नवसेकर, प्रकाश बाळकृष्ण रघुवीर, शैलेश संदेश कासारे, संतोष मधुसूदन शिर्के, सिराज अब्दुल्ला रखांगे, गणेश सूर्यकांत कणेरी, अमित अशोक तांबे, दापाेली तालुकाध्यक्ष भाऊ मोहिते, मंडणगड तालुकाध्यक्ष मुश्ताक मिरकर हे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.