राजापूर तालुक्यातून ६५ हजार पुस्तकांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:42 AM2021-06-16T04:42:39+5:302021-06-16T04:42:39+5:30
राजापूर : यावर्षी तालुक्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाकडे ६५ हजार २९७ पुस्तकांची मागणी करण्यात आली ...
राजापूर : यावर्षी तालुक्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाकडे ६५ हजार २९७ पुस्तकांची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती येथील शिक्षण विभागाकडून देण्यात आली. यामध्ये मराठी विभागासाठी ४५,४३७, हिंदीसाठी ६,०११, इंग्रजी १०,७८४ आणि उर्दूसाठी ३,०६५ पुस्तकांचा सामावेश आहे.
राजापूर तालुका शिक्षण विभागाकडून ही मागणी करण्यात आली आहे. मात्र, सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे अद्यापपर्यंत ही पुस्तके येथील शिक्षण विभागाकडे उपलब्ध झालेली नाहीत. कोविडमुळे छपाई बंद असल्याने यावेळी वेळेवर पुस्तके उपलब्ध झालेली नाहीत. तालुका शिक्षण विभागाकडून मागविण्यात आलेली ही सर्व पुस्तके पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. यावर्षी तालुक्यात सुमारे १६०० नवीन विद्यार्थी आपल्या शिक्षणाचा श्रीगणेशा गिरवणार आहेत. मात्र, कोरोनामुळे नवागतांचे दरवर्षांप्रमाणे वाजत गाजत स्वागत होणार नाही. शिवाय यावर्षीही शाळा सुरू होण्याबाबत कुठलाच निर्णय झालेला नसल्याने यावर्षीही विद्यार्थांना गणवेशही मिळणार नाही, अशी विद्यमान स्थिती आहे.