‘एलिझाबेथ एकादशी’वर बंदी घालण्याची मागणी
By Admin | Published: November 28, 2014 09:49 PM2014-11-28T21:49:16+5:302014-11-28T23:55:07+5:30
पंढरपूरच्या विठ्ठलाची विटंबना करणारी दृश्ये तसेच विधाने असल्याने या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी,
रत्नागिरी : एलिझाबेथ एकादशी या चित्रपटात हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह दृश्ये आणि विधाने असल्याने या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन येथील श्री समस्त वारकरी - फडकरी दिंडी समाज संघटना पंढरपूर अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. सध्या सर्वत्र ‘एलिझाबेथ एकादशी’ हा चित्रपट प्रदर्शित केला जात आहे. या चित्रपटाला नागरिकांची गर्दीही होत आहे. मात्र, या चित्रपटात पंढरपूरच्या विठ्ठलाची विटंबना करणारी दृश्ये तसेच विधाने असल्याने या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीतर्फे करण्यात आली . हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे यांनी स्वीकारले. यावेळी श्री समस्त वारकरी - फडकरी दिंडी समाज संघटनेचे लांजा तालुकाध्यक्ष दादा रणदिवे, विनोद गादीकर, भाजपाचे लांजा सरचिटणीस रूपेश गांगण, हेमंत चाळके, भास्कर खडपे, हिंदू जनजागृती समितीचे अनिल जठार, सनातन चे प्रभाकर सुपल, शुभांगी मुळ्ये आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)