पूल दुरुस्तीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:22 AM2021-06-24T04:22:12+5:302021-06-24T04:22:12+5:30

गुहागर : तालुक्यातील कौंढर काळसूर येथील पुलाची दुरुस्ती आणि पुलाखालील कचरा व गटारे साफ करण्यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने ...

Demand for bridge repairs | पूल दुरुस्तीची मागणी

पूल दुरुस्तीची मागणी

Next

गुहागर : तालुक्यातील कौंढर काळसूर येथील पुलाची दुरुस्ती आणि पुलाखालील कचरा व गटारे साफ करण्यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपअभियंता सलोनी निकम यांना निवेदन देण्यात आले. पावसाळ्यात पुलावरून पाणी जात असल्याने जीवघेणा प्रवास करावा लागतो.

गंधारचे यश

साखरपा : कलापिनी संगीत विद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय तबला वादन स्पर्धेत येथील गंधार कांचन जोगळेकर याने लहान गटात तृतीय क्रमांक पटकावला. पाचव्या वर्षापासून गंधार तबला वादनाचे धडे घेत आहे. त्याला गिरीधर कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

स्मशानभूमीवर अखेर शेड

चिपळूण : शहरातील रामतीर्थ स्मशानभूमीवर शेड नसल्याने पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना नागरिकांना अडचणीचे होत होते. मात्र ठेकेदार दशरथ दाभोळकर यांनी अल्पावधित उत्तम दर्जाची शेड उभाररून दिले आहे. गेल्या अनेक वर्षांची अडचण दूर झाली आहे. त्यामुळे दाभोळकर यांना धन्यवाद देण्यात येत आहेत.

मंडणगडमध्ये योगवर्ग

मंडणगड : आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून मंडणगड तालुका भाजपतर्फे प्रत्यक्ष व ऑनलाईन पद्धतीने योगवर्ग आयोजित करण्यात आले होते. यात ५७ जणांनी सहभाग घेतला. उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या मार्गदर्शनानुसार मंडणगडमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला.

खताचा तुटवडा

सावर्डे : चिपळूण तालुक्यातील पूर्व भागात येणाऱ्या दसपटीमधील गावांमध्ये खताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे लांबणीवर पडण्याचा धोका व्यक्त होत आहे. खते अजूनही वेळेत न मिळाल्यास भातशेती अडचणीत येणार आहे. त्यामुळे खताचा पुरवठा वेळेवर करण्याची मागणी होत आहे.

गुजर यांची निवड

दापोली : दापोली शिवसेनेचे युवा नेते ऋषिकेश गुजर यांची मराठा विद्याप्रसारक मंडळाच्या मराठा मंदिर या प्रशालेच्या शालेय समिती चेअरमनपदी निवड झाली आहे. गुजर हे तालुक्याच्या राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

बिबट्याचा मुक्त संचार

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कोंडीवरे गावात बिबट्याचा पुन्हा मुक्त संचार सुरू झाला आहे. रात्री पाळीव प्राण्यांवर हल्ला करू लागल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या भातशेतीचा हंगाम सुरू असल्याने बिबट्याच्या मुक्त संचारामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

शहरात लसीकरण

रत्नागिरी : शहरातील कोकणनगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, पटवर्धन प्रशाला आणि मिस्त्री हायस्कूलमध्ये ३० ते ४४ तसेच ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी कोविशिल्डचा पहिला डोस देण्यात येणार आहे. यासाठी तिन्ही लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी १०० डोस देण्यात आले आहेत.

सूर्यवंशी यांच्याकडे पदभार

देवरुख : संगमेश्वर तालुका वैद्यकीय अधिकारी पदाचा कार्यभार सायले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याकडे तात्पुरत्या स्वरुपात देण्यात आला आहे. डॉ. शेरॉन सोनावणे या कोरोनाबाधित झाल्याने त्यांच्या जागी सध्या डॉ. सूर्यवंशी हे काम पाहणार आहेत.

हळद रोपांचे वाटप

दापोली : तालुक्यातील देगाव येथे परिसरातील शेतकऱ्यांना प्रो-ट्रेमधील तयार हळदीच्या रोपांचे वाटप करण्यात आले. टेटवली येथील शेतकरी किशोर जुवेकर यांच्या प्रक्षेत्रावर आमदार योगेश कदम यांच्याहस्ते महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीला प्रारंभ करण्यात आला आहे.

Web Title: Demand for bridge repairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.