प्रवेश परीक्षेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:31 AM2021-04-24T04:31:15+5:302021-04-24T04:31:15+5:30
घराचे नुकसान खेड : तालुक्यातील कांदोशी-धनगरवाडी येथे नुकत्याच झालेल्या चक्रीवादळामध्ये घराचे नुकसान झाले आहे. शासकीय यंत्रणेने तातडीने मदत द्यावी, ...
घराचे नुकसान
खेड : तालुक्यातील कांदोशी-धनगरवाडी येथे नुकत्याच झालेल्या चक्रीवादळामध्ये घराचे नुकसान झाले आहे. शासकीय यंत्रणेने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. धनगरवाडीत येथे झालेल्या चक्रीवादळात कोंडीराम अर्जुन बर्गे व अन्य ग्रामस्थांच्या घराचे नुकसान झाले आहे.
वीजवाहिनी बदलण्याची मागणी
रत्नागिरी : तालुक्यातील सैतवडे येथील खतीब मोहल्ला व गुम्बद मोहल्ल्यातील काही भागातील जुनाट वीजवाहिनी न बदलल्याने या ठिकाणी वीजपुरवठा खंडित होण्याची व अपघात होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या वीजवाहिन्या एक ते दोन ठिकाणी जोडण्यात आल्या असल्याने अपघाताचा धोका संभवत आहे.
त्रैवार्षिक यात्रा रद्द
खेड : तालुक्यातील रसाळगड येथील श्री झोलाई वाघजाई देवीची दि. ३० एप्रिल रोजी होणारी त्रैवार्षिक यात्रा कोरोनामुळे शासकीय नियमावलीचे पालन करून रद्द करण्यात आली आहे. या दिवशी फक्त मंदिरात पूजापाठ कार्यक्रम मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत होणार आहेत.
माेफत सिलिंडर वाटप
खेड : काेरोनामुळे लाॅकडाऊन सुरू असल्याने गोरगरीब-गरजू कुटुंबीयांची गैरसोय होऊ नये, यासाठी मुस्लीम समाजातर्फे शहरासह तालुक्यातील पाचशे गरजूंना मोफत गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात येणार आहे. केवळ मुस्लीम नाही, तर अन्य धर्मियांमधील गरजूंना गॅस सिलिंडर वितरण केले जाणार आहे.
गैरसोय दूर
खेड : नगरपरिषद दवाखान्यात लसीकरण सुरू आहे. लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना रांगेत उभे राहावे लागत आहे. तीव्र उन्हाळा सुरू असल्याने दवाखान्याबाहेर मंडप उभारण्यात आला असून, मंडपात फॅनचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे उकाड्यापासून काही अंशी सुटका झाली आहे.
ऑनलाइन प्रकाशन
दापोली : लाॅकडाऊन काळात राज्यातील शिक्षकांनी एकत्र येत सुरू केलेल्या डिजिटल साप्ताहिक ‘शिक्षक ध्येय’चे प्रकाशन करण्यात आले. वर्षभरात पन्नास अंक नियमित प्रकाशित करून त्यांचे ३३४ व्हाट्सॲप ग्रुप, फेसबुक, टेलिग्राम, इन्साटाग्राम, तसेच संकेतस्थळाच्या माध्यमातून तीन लाख शिक्षक, विद्यार्थी व पालकांतर्फे हे साप्ताहिक नियमित पोहोचत आहे.
उपोषणाचा इशारा
दापोली : तालुक्यातील उसगाव-आगरवायंगणी रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी उसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुयोग वैद्य यांनी दिला आहे. महाराष्ट्र दिली उपाेषणाचा इशारा दिला आहे. उसगाव, आगरवायंगणी बाैद्धवाडी फाटा या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.
उत्खनन सुरू
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात ब्रेकर यंत्राचा वापर करून राजरोसपणे दगडाचे उत्खनन सुरू आहे. शासनाला कोणत्याही प्रकारचे स्वामित्व धन न भरता सुरू असलेल्या उत्खननामुळे महसूल बुडत आहे. महामार्गावरील खवटीपासून परशुराम घाटापर्यंत चाैपदरीकरणाचे काम सुरू आहे.
लग्नसमारंभासाठी परवानगी आवश्यक
रत्नागिरी : कोरोनामुळे लाॅकडाऊन घोषित करण्यात आले आहे. लग्नसमारंभांना केवळ २५ माणसांची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, तरीही नियमांचे उल्लंघन होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे लग्नसमारंभासाठी ग्रामपंचायतीची परवानगी घेण्याची सूचना प्रशासनाकडून करण्यात यावी, अशी मागणी जनतेमधून होत आहे.