केंद्र वाढविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:51 AM2021-05-05T04:51:54+5:302021-05-05T04:51:54+5:30

खेड : सध्या १८ ते ४४ वयोगटांतील व्यक्तींसाठी कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. मात्र, या वयोगटातील व्यक्तींची संख्या ...

Demand for expansion of the center | केंद्र वाढविण्याची मागणी

केंद्र वाढविण्याची मागणी

Next

खेड : सध्या १८ ते ४४ वयोगटांतील व्यक्तींसाठी कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. मात्र, या वयोगटातील व्यक्तींची संख्या लक्षात घेता, लसचा लाभ सर्व व्यक्तींना मिळण्यासाठी लसीकरण केंद्राची संख्या वाढवावी, अशी मागणी युवासेनेने आमदार योगेश कदम, तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्याकडे केली आहे.

विशेष लसीकरण मोहीम

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील ओझरे खुर्द आरोग्य उपकेंद्रांमार्फत पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम उपक्रम राबविण्यात आला. एकाच दिवशी या मोहिमेचा लाभ सुमारे २०० कर्मचाऱ्यांनी घेतला. संगमेश्वर तालुका आरोग्य विभागाने ही विशेष मोहीम राबविली.

वाहनचालकांना वळसा

आवाशी : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथे भुयारी मार्गाचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे. यासाठी यंत्रणा दिवसभर काम करीत आहे. या कामासाठी आंबवलीच्या दिेशेने जाणारा मार्ग गेल्या दोन दिवसांपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आंबवली मार्गावर जाण्यासाठी वाहनचालकांना वळसा मारून जावे लागत आहे.

मोफत धान्याचे वाटप

देवरुख : येथील तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागातर्फे संगमेश्वर तालुक्यातील प्राधान्य आणि अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्यवाटपाला सुरुवात झाली आहे. प्रति माणशी तीन रुपये दराने तीन किलो तांदूळ आणि दोन किलो दराने दोन किलो गहू वितरित केला जात आहे.

लाभार्थ्यांना दिलासा

रत्नागिरी : महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य प्रधानमंत्री योजनेंतर्गत कोरोनाबाधितांनाही मोफत उपचार देण्यात यावेत, असे आदेश केंंद्र सरकार, तसेच राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या योजनेनुसार या लाभार्थ्यांसाठी ८० टक्के बेड आरक्षित होणार आहेत.

कोविड सेंटरला मशीन भेट

दापोली : येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या कोविड सेंटरमधील रुग्णांना पिण्यासाठी गरम पाण्याची सुविधा मिळावी, यासाठी संतोष अबगुल प्रतिष्ठानतर्फे पाणी गरम करण्याचे मशीन भेट देण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश भागवत आणि डॉ.कुणाल मेहता यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले आहे.

लसची प्रतीक्षा

लांजा : सध्या १८ ते ४४ वयोगटांतील व्यक्तींना आठवडाभर लस देण्यात येणार आहे. मात्र, ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी केंद्र शासनाकडून लसचा पुरवठा झालेला नाही. काहींचा अजूनही पहिला डोस घ्यायचा आहे, तर काहींचा दुसरा डोस शिल्लक आहे. त्यामुळे हे नागरिक सध्या कोरोना लस येण्याची प्रतीक्षा करू लागले आहेत.

भाजीची आवक वाढली

चिपळूण : शहरात सध्या भाजीची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, परंतु कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे भाजी खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. यामुळे सध्या भाजीविक्रेत्यांना भाज्यांचे दर खाली आणण्याची वेळ आली आहे.

आरोग्य शिबिर

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील निवे बुद्रुक आश्रम शाळा, तुळसणी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. आर.बी. वेल्हाळ इन्फ्रा स्ट्रक्चर कंपनीतर्फे हे शिबिर आयोजित केले होते. यावेळी विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकीन, तसेच मास्कचे वाटपही करण्यात आले.

रक्तदान शिबिराचे आयोजन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीतर्फे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत कोरोनाविषयक नियमांचे पालन करून हे शिबिर घेण्यात येणार आहे.

Web Title: Demand for expansion of the center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.