मृतांसह जखमींना आर्थिक मदतीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:29 AM2021-05-01T04:29:39+5:302021-05-01T04:29:39+5:30
खेड : सातारा जिल्ह्यातील कुडपणनजीकच्या कुमठे कांदोशी येथे वऱ्हाडाचा ट्रक १०० फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात खेड तालुक्यातील ...
खेड : सातारा जिल्ह्यातील कुडपणनजीकच्या कुमठे कांदोशी येथे वऱ्हाडाचा ट्रक १०० फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात खेड तालुक्यातील खवटी व तुळशी-धनगरवाडीतील तिघांचा मृत्यू व २२ जण जखमी झाले. या अपघातातील मृतांसह जखमींना तातडीने आर्थिक मदत देऊन आधार द्या, अशा मागणीचे निवेदन महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र आखाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
खवटी - धनगरवाडी येथील प्रकाश ढेबे यांचा ८ जानेवारी रोजी विवाह सोहळा पार पाडून परतणाऱ्या वऱ्हाड्यांचा ट्रक दरीत कोसळून तिघांचा मृत्यू झाला होता. या अपघातातील जखमी व्यक्तींना औषधोपचारासाठी लाखो रूपयांचा खर्च करावा लागत असून, अनेकांना कायमचेच अपंगत्व आले आहे. या अपघातातील मृतांसह जखमींना तातडीने मदत मिळावी, यासाठी विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी शासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, अद्याप कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही. दुर्गम भागात वास्तव्यास असलेल्या मृतांच्या कुटुंबियांसह जखमींना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी रामचंद्र आखाडे यांनी निवेदनातून केली आहे.