साखरीनाटे रस्त्यासाठी निधीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:31 AM2021-03-19T04:31:29+5:302021-03-19T04:31:29+5:30
राजापूर : तालुक्यातील साखरीनाटे गावातील मुख्य रस्त्यावरील राजापूर अर्बन बँक नाटे शाखेपासून पुढे हुनामास्तर बंदररोड रस्त्याची दुरवस्था झाली असून, ...
राजापूर : तालुक्यातील साखरीनाटे गावातील मुख्य रस्त्यावरील राजापूर अर्बन बँक नाटे शाखेपासून पुढे हुनामास्तर बंदररोड रस्त्याची दुरवस्था झाली असून, या रस्त्यासाठी निधी मिळावा आणि रस्ता पूर्ण करावा, अशी मागणी साखरीनाटे भागातील ग़्रामस्थांनी केली आहे.
भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर व भाजपा तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांनी ग्रामस्थांसोबत या रस्त्याची पाहणी केली. यावेळी या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही नागरेकर व गुरव यांनी ग्रामस्थांना दिली आहे.
साखरीनाटे भागातील सर्वच समस्यांकडे स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे गावातील रस्त्यांची पुरती दुरवस्था झाल्याची कैफियत यावेळी ग्रामस्थांनी मांडली. निवडणुका आल्या ही साखरीनाटेवासीयांना केवळ पोकळ आश्वासने दिली जातात; पण पूर्तता केली जात नाही, असेही यावेळी ग्रामस्थांनी सांगितले.
यावेळी साखरीनाटे सरपंच नौशाद धालवेलकर, माजी सरपंच साआदत हाबीब, जिल्हा बँक संचालक अमजद बोरकर, वजुद बेबजी, शफी वाडकर, सफवान फणसोपकर, भाजपाचे युवा कार्यकर्ते अरविंद लांजेकर उपस्थित होते.