भगवती बंदर येथील खन्ना कंपनी परिसरातील अधिकृत बांधकाम हटविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:30 AM2021-04-17T04:30:58+5:302021-04-17T04:30:58+5:30
रत्नागिरी : शहरानजीकच्या भगवती बंदर खन्ना कंपनी येथील अनधिकृत पक्के बांधकाम हटविण्याबाबत भाजपचे कार्यकर्ते रमाकांत आयरे यांनी शुक्रवारी ...
रत्नागिरी : शहरानजीकच्या भगवती बंदर खन्ना कंपनी येथील अनधिकृत पक्के बांधकाम हटविण्याबाबत भाजपचे कार्यकर्ते रमाकांत आयरे यांनी शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.
या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, रत्नागिरी येथील भगवती बंदर या परिसरातील खन्ना कंपनी येथील जागेत अनधिकृत रहिवासी वापर स्वरूपाची पक्की बांधकामे करण्यात आली आहेत. या बांधकामांसाठी या प्रभागातील नगरसेविकेचा वरदहस्त असल्याची परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा आहे. ही जागा कोस्टगार्डकडे असून अनधिकृत बांधकामे करून घर नंबर, नळ कनेक्शन, वीज कनेक्शन देण्याची कार्यवाहीही केलेली आहे.
अशा बांधकामांना कोस्टगार्डने नोटिसा देऊन व प्रत्यक्ष ती हटविण्याची कार्यवाही करूनही या नगरसेविकेचा वरदहस्त असल्याने कोस्टगार्डच्या कार्यवाहीला न जुमानता पक्क्या स्वरूपाची बांधकामे करण्यात आली आहेत. ही बांधकामे त्वरित हटवून कोस्टगार्डने कायदेशीर कार्यवाही करावी व आपल्या प्रयोजनासाठी जागा तात्काळ ताब्यात घ्यावी, याबाबत आदेश व्हावेत, अशी मागणीही रमाकांत आयरे यांनी या निवेदनात केली आहे.