लोकशाही दिन सोमवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:32 AM2021-04-01T04:32:30+5:302021-04-01T04:32:30+5:30
रत्नागिरी : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. कोरोनाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग ...
रत्नागिरी : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. कोरोनाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून एप्रिल महिन्याचा लोकशाही दिन ५ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्षात न होता दुपारी १ ते २ या वेळेत दूरध्वनी व दूरचित्रवाणी (व्हिडिओ कॉन्फरन्स) च्या माध्यमातून होणार आहे.
या लोकशाही दिनाकरिता नागरिकांना संबंधित तहसील कार्यालयामध्ये उपस्थित राहून दूरचित्रवाणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लोकशाही दिनामध्ये सहभागी होता येईल तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील०२३५२-२२६२४८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून
आपल्या समस्या मांडता येतील. तसेच gb_ratnagiri@rediffmail.com या ई-मेल वर अर्ज सादर करता येतील.
लोकशाही दिनामध्ये नागरिकांच्या शासकीय कार्यालयाशी संबंधित विविध समस्यांबाबत निवेदने, तक्रारी सादर करता येतील. माजी-आजी सैनिक यांच्या शासकीय कार्यालयांशी संबंधित विविध समस्यांबाबत तक्रारी असल्यास त्यांची निवेदने, तक्रारी लोकशाही दिनात प्रथम स्वीकारल्या जातील. त्यानंतरच इतर नागरिकांच्या तक्रारी स्वीकारल्या जातील, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.