डेमो हाऊस बांधणी कार्यक्रमाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:33 AM2021-03-27T04:33:13+5:302021-03-27T04:33:13+5:30
फोटो : देवरूख पंचायत समिती कार्यालय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत डेमो हाऊस बांधणी कार्यक्रमाचे भूमिपूजन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते ...
फोटो : देवरूख पंचायत समिती कार्यालय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत डेमो हाऊस बांधणी कार्यक्रमाचे भूमिपूजन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सभापती जयसिंग माने उपस्थित हाेते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवरुख : देवरूख पंचायत समिती कार्यालय परिसरात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत डेमो हाऊस बांधणी कार्यक्रमाचे भूमिपूजन आमदार शेखर निकम व पंचायत समिती सभापती जयसिंग माने यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सदस्य संजय कांबळे, सारिका जाधव उपस्थित होत्या. त्याचबरोबर तहसीलदार सुहास थोरात, गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर, सहाय्यक गटविकास अधिकारी दीप्ती गाट, विस्तार अधिकारी शंकर घुले, एन. बी. पारसे, कृषी अधिकारी विनोदकुमार शिंदे आदी कर्मचारी, पंकज पुसाळकर, बाळू ढवळे, नगरसेवक प्रफुल्ल भुवड उपस्थित होते.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरे बांधत असताना त्या-त्या ठिकाणची स्थानिक भौगोलिक परिस्थिती, पारंपरिक बांधकाम पद्धती, स्थानिक स्तरावर उपलब्ध होणारी साधन सामग्री इत्यादींचा विचार करून बांधण्यात येणारे घरकुल हे लाभार्थ्यांना राहण्यासाठी सोईस्कर व लाभार्थी स्नेही होण्याच्या दृष्टीने बांधकाम मार्गदर्शक ठरावी यासाठी डेमो हाऊस डिझाईन करण्यात आले. त्या डेमोचा भूमिपूजन सोहळा करण्यात आला. याकरिता बांधकामाकरिता निधीची तरतूद आणि कसा निधी उपलब्ध होऊ शकेल याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.