युती शासनापासून देवगडला अधोगती

By admin | Published: May 22, 2016 12:42 AM2016-05-22T00:42:20+5:302016-05-22T00:47:46+5:30

प्रकाश राणे यांची टीका : विलास साळसकर यांच्या आरोपांना प्रत्युत्तर

Deogarh from the alliance government will be degraded | युती शासनापासून देवगडला अधोगती

युती शासनापासून देवगडला अधोगती

Next

देवगड : देवगड तालुक्यामध्ये युतीशासन सत्तेत आल्यापासून विकासकामे होणे दूरच रािहली आहेत. यामुळे तालुका विकासकामांपासून अधोगतीकडे गेला आहे. असे असताना शिवसेना तालुकाप्रमुख साळसकर हे विकासकामे करण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नसून, टीका करणे व तालुक्यातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामांची माहितीच्या अधिकाराने माहिती मिळविणे, अधिकाऱ्यांवर दबाव टाकणे हा शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांचा उपक्रम असल्याची टीका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश राणे यांनी पत्रकार परिषदेत केली.
देवगड येथील काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपतालुकाध्यक्ष उल्हास मणचेकर, विभागीय अध्यक्ष योगेश चांदोस्कर, शरद ठुकरूल आदी उपस्थित होते.
राणे म्हणाले की, राष्ट्रीय पेयजल योजनेमधून मुणगे येथील ९४ लाख ९४ हजार ७०० रूपयांच्या नळ योजनेला मंजुरी मिळून ८६ लाख ३१ हजार ५०० रूपये निधीच्या या योजनेचे काम सुरु झाले.
या योजनेचे काम २४ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१५ या मुदतीत पूर्ण करायचे होते. मात्र, हे काम विहिरीपासून टाकीपर्यंत १ किमीवर पाईपलाईन टाकून उर्वरित काम अपूर्ण ठेवले आहे. असे असताना देखील ४७ लाख रूपये रक्कम ठेकेदाराला अदा केली आहे. हा ठेकेदार कोण याचा शोध राणे यांनी घेण्यापेक्षा याचा सवाल मुणगे ग्रामपंचायतीला विचारावा. मुणगे ग्रामपंचायत ही भाजपच्या ताब्यात असून, तेथे भाजपचे सरपंच कार्यरत आहेत.
आमदार राणे यांनी निवडणुकीपूर्वी जनतेच्या संपर्कात राहीन, असे आश्वासन दिले होते. त्याचप्रमाणे त्यांचे नियोजित दौरे असल्यामुळे आश्वासनाची पूर्तता करत असल्याचे प्रकाश राणे यांनी सांगितले. पंचायत समितीच्या सभेमध्ये पाणीटंचाईवर एकही शब्द काढला नाही तर तुमचे सदस्य त्यावेळी काय करत होते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच पाणीचोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे काम आमदार तथा जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे नसून, गावातील पाणीपुरवठा कमिटीचे असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच पाणीटंचाईच्या २०१५-१६च्या आराखड्यानुसार ९४ विंंधन विहीरींच्या मागणीपैकी ६५ विंंधन विहीरींची अंदाजपत्रके पाठविण्यात आली. त्यापैकी २१ विंंधन विहिरींना मंजुरी मिळाली. मात्र, मे महिना सरत असताना देखील अजूनही एकही काम सुरु का झाले नाही याचा आढावा राणे यांनी पाणीटंचाईच्या बैठकीत का घेतला नाही, या विषयाची परिपूर्ण माहिती न घेता प्रत्येक गोष्टीवर टीका करण्यापेक्षा प्रथम माहिती घ्या व नंतर टीका करा. यापैकी २१ विंेधन विहीरींपैकी ४ विंेधन विहीरींचे बक्षीसपत्र झाले असून, अन्य १७ विंंधन विहीरींचे बक्षिसपत्र अद्यापही झाले नसल्यामुळे कामे प्रलंबित आहेत.
कामे पूर्ण होण्यासाठी विलंब लागणार असल्यामुळे आमदारांनी देवगड व जामसंडे शहरात स्थानिक विकासनिधीमधून बोअरवेलची कामे सुचविली. खाकशी, भटवाडी, बेलवाडी, मळई, कट्टा, देवगड नलावडे कॉम्प्लेक्स आदी ठिकाणी स्वनिधीतून विकासकामे सुरू आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Deogarh from the alliance government will be degraded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.