पैशांच्या व्यवहारातून महिलेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:42 AM2021-06-16T04:42:38+5:302021-06-16T04:42:38+5:30
राजापूर : उसने घेतलेल्या पैशाच्या तिप्पट पैशाची मागणी केल्याबाबत विचारणा केल्याच्या रागातून घरात घुसून मारहाण करून महिलेचा विनयभंग केल्याची ...
राजापूर : उसने घेतलेल्या पैशाच्या तिप्पट पैशाची मागणी केल्याबाबत विचारणा केल्याच्या रागातून घरात घुसून मारहाण करून महिलेचा विनयभंग केल्याची घटना शहरातील मापारीवाडा येथे रविवारी, २१ जून राेजी दुपारी ३़.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी राजापूर पाेलिसांनी तिघांविराेधात गुन्हा दाखल केला असून, दाेघांना अटक केली आहे.
याप्रकरणी पीडित महिलेने पाेलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यानुसार या महिलेच्या मुलाने रमीज रज्जाक डाेसानी याच्याकडून उसने पैसे घेतले हाेते. मुलाने ५ हजार रूपये घेतले असून, त्याच्याकडे १५ हजार रुपयांची ताे मागणी करत हाेता, असे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत त्याला विचारणा केली असता रमीज रज्जाक डाेसानी, सुफियात इकबला हाजू (१८, रा़ काेदवली, साईनगर, राजापूर) आणि सुफियात याचा भाऊ २१ राेजी दुपारी ३़ ३० वाजता घरी आले. त्यावेळी ते घरात घुसून हुज्जत घालू लागले. यावेळी त्या महिलेचे पती समजाविण्यासाठी गेले असता हाताच्या ठाेशाने मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत महिलेच्या अंगावर धावून आले. तसेच मनास लज्जा उत्पन्न हाेईल, असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच महिलेला जमिनीवर पाडून लाथाबुक्क्याने मारहाण केल्याचेही म्हटले आहे. यावेळी महिलेची सासू सोडविण्यासाठी आली असता तिलाही मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी राजापूर पोलिसांनी तिघांविराेधात गुन्हा दाखल केला असून, यातील रमीज रज्जाक डोसानी व सुफियात इक्बाल हाजू यांना अटक करण्यात आली आहे. तर यातील सुफियान याचा भाऊ अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिल्पा वेंगुर्लेकर करत आहेत.