शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना; शिवसेनेने कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याला मारले जोडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 12:44 PM2021-12-21T12:44:54+5:302021-12-21T12:48:33+5:30
कर्नाटकमध्ये शिवपुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. या
रत्नागिरी : कर्नाटकमध्ये शिवपुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेनंतर राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ रत्नागिरीतील शिवसैनिकांनी आज, मंगळवारी रत्नागिरीतील खासदार विनायक राऊत यांच्या कार्यालयासमोर निदर्शन केली. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारुन निषेध करण्यात आला.
शिवपुतळ्याच्या विटंबनेच्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी शिवपुतळ्यावर दुग्धाभिषेक करुन शिवाजी महाराजांचा जयघोष केला. तर रत्नागिरीतील शिवसैनिकांनी आज, मंगळवारी सकाळी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कर्नाटक सरकारचा निषेध केला.
यावेळी जिल्हाप्रमुख विलास चाळके, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उदय बने, नगराध्यक्ष प्रदीप साळवी, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, संजय साळवी, प्रमोद शेरे, प्रशांत साळुंखे, शिल्पा सुर्वे, व अन्य शिवसैनिक उपस्थित होते.