CoronaVirus In Ratnagiri : पॉझिटिव्ह असूनही चढला बोहल्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 03:16 PM2021-05-07T15:16:17+5:302021-05-07T15:24:58+5:30

CoronaVirus Ratnagiri: लग्नासाठी सज्ज असलेला नवरदेवच चक्क पॉझिटिव्ह आल्याचा धक्कादायक प्रकार गुहागर तालुक्यातील शीर येथे बुधवारी घडला़ बरं, आपण पॉझिटिव्ह आहोत हे माहित असूनही नवरदेव बोहोल्यावर चढल्याने २३ जणांवर गृह अलगीकरणात राहण्याची वेळ आली आहे़ तर वऱ्हाडी मंडळींना ५० हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे.

Despite being positive, he climbed the ladder | CoronaVirus In Ratnagiri : पॉझिटिव्ह असूनही चढला बोहल्यावर

CoronaVirus In Ratnagiri : पॉझिटिव्ह असूनही चढला बोहल्यावर

Next
ठळक मुद्देपॉझिटिव्ह असूनही चढला बोहल्यावर गुहागरात वऱ्हाडी मंडळींना ५० हजारांचा दंड

गुहागर : लग्नासाठी सज्ज असलेला नवरदेवच चक्क पॉझिटिव्ह आल्याचा धक्कादायक प्रकार गुहागर तालुक्यातील शीर येथे बुधवारी घडला़ बरं, आपण पॉझिटिव्ह आहोत हे माहित असूनही नवरदेव बोहोल्यावर चढल्याने २३ जणांवर गृह अलगीकरणात राहण्याची वेळ आली आहे़ तर वऱ्हाडी मंडळींना ५० हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे.

गुहागर तालुक्यातील सडेजांभारी येथील मुलाचे लग्न शीरमधील मुलीबरोबर ठरले होते. हा विवाह ५ मे रोजी होता़ विवाहासाठी प्रांताधिकारी यांच्याकडून परवानगी घेण्यात आली होती. त्यातील अटीप्रमाणे वधुवराकडील मंडळींनी आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्रात ४ मे रोजी कोरोनाची तपासणीही केली होती. प्रांतांनी दिलेल्या परवानगीची एक प्रत शीर ग्रामपंचायतीलाही देण्यात आली होती.

गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सजग असलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाने वधुकडील मंडळींचे कोरोना तपासणी अहवाल आधीच तपासले होते. ५ मे रोजी शीरचे सरपंच विजय धोपट, तंटामुक्ती अध्यक्ष अनंत पवार, तलाठी बी. एच. राठोड, ग्रामसेवक एकनाथ पाटील, पोलीस पाटील संदीप घाणेकर हे सर्वजण विवाहस्थळी गेले होते.

विवाहादरम्याने वरपक्षाकडे कोरोना तपासणीचा अहवाल मागण्यात आला. त्यावेळी आम्ही चाचणी केली असून, अजून अहवाल आलेला नसल्याचे सांगण्यात आले. विवाह सोहळ्यात विघ्न नको म्हणून प्रशासनाने अधिक चौकशी न करता प्रांतांच्या आदेशाप्रमाणे विवाह पार पाडा, अशी सूचना दिली़.

वरपक्षाकडील कोरोना चाचणीची खात्री करण्यासाठी तलाठी व ग्रामसेवक यांनी आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्रात चौकशी केली. त्यावेळी नवरदेव कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. ही माहिती मिळताच प्रशासकीय पथक विवाहस्थळी दाखल झाले आणि या पथकाने वरपक्षाकडे चौकशी सुरू केली. दाखल्याची मागणी केली.

अखेर वराने आपण कोरोनाबाधित असल्याची कबुली दिली. ही बाब उघड होताच शासकीय पथकाने नवरदेव कोविड १९ पॉझिटिव्ह असल्याने साथ रोग नियंत्रण प्रसाराबद्दल असा उल्लेख करून ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच नवरा मुलगा कोरोनाबाधित असल्याने सर्वांना तातडीने गृह अलगीकरणात जाण्याच्या सक्त सूचना दिल्या़ या कारवाईनंतर नवरदेव कोरोनाबाधित असतानाही शीरमधील मंडळींनी वधुची सासरी पाठवणी केली आहे. तर नवरदेवासह सर्वांची वरात गृह अलगीकरणात पोहोचली आहे.

Web Title: Despite being positive, he climbed the ladder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.