माहेर संस्थेतील निराधारांना मिळाला लसीकरणाचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:37 AM2021-09-24T04:37:52+5:302021-09-24T04:37:52+5:30
रत्नागिरी : नजीकच्या हातखंबा व कारवांचीवाडी येथील निराधारांचा आधार ठरलेल्या माहेर संस्थेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ...
रत्नागिरी : नजीकच्या हातखंबा व कारवांचीवाडी येथील निराधारांचा आधार ठरलेल्या माहेर संस्थेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोव्हिशिल्ड लसीकरणाचे आयोजन आरोग्य खात्याकडून करण्यात आले.
त्यामध्ये हातखंबा, तारवेवाडी येथील माहेर संस्थेत हातखंबा प्राथमिक आरोग्य केंद्राकडून ३४ महिलांना व कारवांचीवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून ३८ पुरुषांना कोव्हिशिल्ड लस देण्यात आली. यामध्ये पहिला डोस ६६ व दुसरा डोस ६ जणांना देण्यात आला. संस्थेतील ७२ निराधार लोकांनी या लसीकरणाचा लाभ घेतला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदूराणी जाखड, तसेच पंचायत समितीच्या समाजकल्याण सभापती संजना माने, गटविकास अधिकारी, हातखंबा गावचे ग्रामसेवक, सरपंच, आरोग्य खात्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी, तसेच इतर सामाजिक कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने हे लसीकरण शिबिर पार पडले.
या लसीकरणाचा माहेर संस्थेतील निराधारांना लाभ दिल्याबद्दल माहेर संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.