देवाचेगोठणे - सोलगाव - नाटे दशक्रोशी रिफायनरी समर्थक समितीची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:21 AM2021-07-08T04:21:57+5:302021-07-08T04:21:57+5:30
राजापूर : प्रकल्प अथवा उद्योग आम्हाला हवाय, अशी मागणी करणारी समिती प्रथमच राजापुरात स्थापन करण्यात आली आहे. रिफायनरी प्रकल्पासाठी ...
राजापूर : प्रकल्प अथवा उद्योग आम्हाला हवाय, अशी मागणी करणारी समिती प्रथमच राजापुरात स्थापन करण्यात आली आहे. रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू, सोलगाव परिसरातील जागेचा पर्यायी विचार होत असताना या परिसरात प्रकल्प यावा याकरिता देवाचेगोठणे - सोलगाव - नाटे दशक्रोशी रिफायनरी समर्थक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी नाटे येथील डॉ. सुनील राणे यांची, तर सचिवपदी सोलगाव येथील मनोहर गुरव यांची निवड करण्यात आली आहे.
देवाचेगोठणे - सोलगाव - नाटे दशक्रोशी रिफायनरी समर्थक समिती तयार केल्यानंतर येत्या दोन दिवसांत गोवळ शिवणेखुर्द -बारसू दशक्रोशी समितीचीही घोषणा करण्यात येणार आहे. या दोन्ही समित्यांची घोषणा झाल्यानंतर त्यामध्ये आणखी सदस्य समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
नव्याने स्थापन केलेल्या समितीच्या अध्यक्षदी डॉ. सुनील राणे (नाटे) यांची तर उपाध्यक्षपदी सुहास तथा भाई पाटील, राजाराम गुरव, विजय गुरव, प्रदीप म्हादळकर (सोलगाव), संतोष चव्हाण (नाटे), राजा हळदणकर (वाडातिवरे), अशोक बंडबे (वाडापाणेरी), सुभाष श्रृंगारे (राजवाडी), विनायक दीक्षित, अविनाश नवाळे (देवाचेगोठणे) यांची व सचिवपदी मनोहर गुरव (सोलगाव) यांची निवड करण्यात आली आहे. सदस्य म्हणून अनंत बंडबे, अजित बंडबे (वाडापाणेरी), काशिनाथ गुरव, दत्तप्रसाद गुरव, नितीन गुरव, रामदास गुरव, सुहास गुरव, हरीश नरसुले, अल्पेश गुरव, राजन गुरव, ओमकार गुरव, संदीप गुरव (सोलगाव), सुनील नवाळे, अक्षय ठोंबरे, अरविंद जाधव, सुभाष जाधव, रत्नाकर कोरगावकर (देवाचेगोठणे), दीपक रमाकांत बंडबे, प्रकाश तिर्लोटकर, संजय कुळ्ये, अमित पाटील, अजय पोकळे, दिलीप धामापूरकर, प्रमोद लिंगायत (धाऊलवल्ली) यांचा समावेश आहे.