देवरुखचे सभापती करणार आराेग्य केंद्राची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:29 AM2021-03-21T04:29:26+5:302021-03-21T04:29:26+5:30
साखरपा : शिमगोत्सवासाठी चाकरमानी गावी येऊ लागले आहेत. तर दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर संगमेश्वर पंचायत समितीचे ...
साखरपा : शिमगोत्सवासाठी चाकरमानी गावी येऊ लागले आहेत. तर दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर संगमेश्वर पंचायत समितीचे सभापती जयसिंग माने संगमेश्वर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देणार आहेत. २४ व २५ मार्च रोजी केंद्रांना भेट देऊन पाहणी करणार आहेत.
कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्याचबरोबर कोकणात शिमगोत्सवासाठी मुंबई व बाहेरगावावरून चाकरमानी मोठ्या प्रमाणात येत असतात. त्या अनुषंगाने येणाऱ्या चाकरमान्यांची योग्य प्रकारे व्यवस्था व्हावी. त्यांचे नियोजन योग्य प्रकारे व्हावे व शिमगोत्सवात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य सरपंच, रुग्णकल्याण समिती सदस्य, सल्लागार समिती सदस्य, ग्रामकृतीदल यांच्याकडून गावात शिमगोत्सवासाठी येणाऱ्या व्यक्तींची यादी तयार करून कोविड १९ च्या अनुषंगाने स्थानिक पातळीवर तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन यंत्रणेने केले आहे. त्यासंदर्भात बैठक घेणार आहेत. पंचायत समिती सभापती जयसिंग माने, तहसीलदार सुहास थोरात, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शेरॉन सोनावणे, गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर (गट अ) उपस्थित राहणार आहेत.
या भेटीदरम्यान २५ मार्च २०२१ रोजी सकाळी १० वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र कोंडउमरे, ११.३० वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र कडवई, दुपारी १ वाजता माखजन, २.३० वाजता फुणगूस, सायंकाळी ४ वाजता वांद्री, ५ वाजता धामापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देणार आहेत. तसेच २४ रोजी सकाळी १० वाजता बुरंबी, ११.३० वाजता सायले, दुपारी १ वाजता निवे खुर्द, ३ वाजता देवळे व सायंकाळी ४.३० वाजता साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे बैठक होणार आहे.