देवडेची आकांक्षा कदम ठरली मालदीवमध्ये ‘क्वीन’ : रत्नागिरी जिल्ह्याचे नाव रोशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 11:45 PM2019-10-11T23:45:23+5:302019-10-11T23:46:16+5:30
यामुळे भारताने ‘बेस्ट सिरीज’ पटकावले आहे, तर दुहेरीच्या सामन्यात झालेल्या लढतीत ४-१ असा विजय प्राप्त केला आहे. आकांक्षा सध्या रत्नागिरी येथील शिर्के प्रशालेत नववीमध्ये शिक्षण घेत आहे.
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील देवडे गावची सुकन्या आकांक्षा उदय कदम ही राष्टÑीय खेळाडू आंतरराष्टय स्पर्धेमध्ये चांगली चमक दाखवत भारत - मालदीव प्रेसिडेंट चषक कॅरम लीगची विजेती ठरली आहे. आकांक्षाने भारताचा झेंडा मालदीवमध्ये फडकावत सुवर्णपदक मिळविले आहे.
अत्यंत कमी वयामध्ये आकांक्षाने अवकाशाला गवसणी घालत हे यश संपादन केले आहे. श्रीलंकेतील इंडो-मालदीव येथे ६ ते १० आॅक्टोबर या कालावधीत आंतरराष्टÑीय कॅरम स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये श्रीलंका, मालदीव, भारत या देशांचे संघ सहभागी झाले होते. यामध्ये भारताचे नेतृत्व संगमेश्वर तालुक्यातील देवडे गावची सुकन्या आकांक्षा करीत होती. यामध्ये तिने सिंगलमध्ये ९-८ असा सामना मारला आहे. यामुळे भारताने ‘बेस्ट सिरीज’ पटकावले आहे, तर दुहेरीच्या सामन्यात झालेल्या लढतीत ४-१ असा विजय प्राप्त केला आहे. आकांक्षा सध्या रत्नागिरी येथील शिर्के प्रशालेत नववीमध्ये शिक्षण घेत आहे.
तिला कॅरमपटू संदीप देवरूखकर, महेश देवरूखकर, महाराष्टÑ कॅरम असोसिएशनचे अरूण केदार, विनोद मयेकर, मुख्याध्यापिका गायत्री गुळवणी, रत्नागिरीचे प्रदीप भाटकर, मिलिंद साप्ते लिमये, मंदार दळवी, राहुल बर्वे, रवी कॅरमचे रवी घोसाळकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
मानाचा तुरा
आकांक्षाचे मामा संदीप देवरूखकर हे राष्टÑीय कॅरमपटू असल्याने त्यांचा प्रभाव तिच्या खेळावर पडला. लहानपणापासून कॅरम खेळताना कॅरमचे बाळकडू ती मामाकडून घेऊ लागली. कॅरम खेळण्यामध्ये तरबेज होत तिने अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होत यश मिळवले आहे. राष्टÑीय कॅरमपटूबरोबरच आज आकांक्षाने आंतरराष्टÑीय खेळाडू म्हणून मानाचा तुरा मिळविला आहे.
अनेकांसाठी ‘आयडॉल’
१४ वर्षांची असलेली आकांक्षा ही भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केलेली पहिलीच लहान खेळाडू ठरली आहे, तर रत्नागिरी जिल्ह्यातून आंतरराष्टÑीय स्पर्धेकरिता भाग घेणारी आकांक्षा ही तिसरी कॅरमपटू ठरत आहे. आकांक्षाने आंतरराष्टÑीय स्तरावर मिळविलेले यश हे स्पृहणीय आहे. कमी वयामध्ये मिळविलेल्या या दैदिप्यमान यशामुळे आकांक्षा ही अनेकांसाठी ‘आयडॉल’ बनली आहे.
मालदीव येथे भारत - मालदीव प्रेसिडेंट चषक कॅरम लीग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या आकांक्षा कदम हिच्यासमवेत संघातील खेळाडू उपस्थित होते.