मासळी उतरविण्याच्या ११ केंद्रांचाही विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 06:57 PM2021-02-22T18:57:30+5:302021-02-22T18:58:56+5:30

Ratnagiri HraneBandar Fishrman- रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णेै आणि साखरीनाटे या २ बंदरांसह मासळी उतरवण्याच्या ११ केंद्रांचा विकास करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्यात आला आहे. ही योजना पंतप्रधान मत्स्यसंपदा किंवा सागरमाला योजनेद्वारे राबविण्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. बंदरांसह केंद्रांचा विकास झाल्यास मासेमारी व्यवसायाला चालना मिळणार आहे.

Development of 11 fish landing centers | मासळी उतरविण्याच्या ११ केंद्रांचाही विकास

मासळी उतरविण्याच्या ११ केंद्रांचाही विकास

googlenewsNext
ठळक मुद्देमासळी उतरविण्याच्या ११ केंद्रांचाही विकास  व्यवसायाला चालना, केंद्राकडे प्रस्ताव

रत्नागिरी : जिल्ह्यातील हर्णेै आणि साखरीनाटे या २ बंदरांसह मासळी उतरवण्याच्या ११ केंद्रांचा विकास करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्यात आला आहे. ही योजना पंतप्रधान मत्स्यसंपदा किंवा सागरमाला योजनेद्वारे राबविण्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. बंदरांसह केंद्रांचा विकास झाल्यास मासेमारी व्यवसायाला चालना मिळणार आहे.

मासेमारी व्यवसायाबरोबरच व्यापारी, दळणवळण आणि पर्यटनवाढीच्या दृष्टीनेही बंदरे व मासळी उतरविणाऱ्या केंद्रांचा विकास खूप महत्त्वाचा ठरणार आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण किनारपट्टीवरील बंदरांचा यात समावेश आहे. या कामासाठी महाराष्ट्र शासनाने ३१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

सर्वेक्षण आणि सविस्तर प्रकल्प अहवाल बंगळुरू येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कोस्टल इंजिनिअरिंग फॉर फिशरीज (सीआयसीईएफ) या केंद्र सरकारच्या नोडल एजन्सीकडे तांत्रिक छाननीसाठी पाठवण्यात आला होता. सीआयसीईएफ या संस्थेच्या पथकाने पाहणी करुन पहिल्या टप्प्यात ४ प्रमुख बंदरे आणि मासळी उतरवण्याच्या २० केंद्रांना मान्यता दिली आहे. ८ प्रमुख बंदरे व मासळी उतरविणाऱ्या ५९ केंद्रांचा यामध्ये समावेश आहे. त्यानुसार एकूण ६३५ कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल केंद्र शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.

या बंदर विकास योजनांमध्ये राज्य आणि केंद्र शासनाकडून प्रत्येकी ५० टक्के निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. सर्वेक्षण आणि सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केले गेले तेव्हा पंतप्रधान मत्स्यसंपदा योजना अस्तित्त्वात नव्हती. त्यामुळे या प्रकल्पांना केंद्र शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर हे प्रकल्प पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेतून करायचे की, सागरमाला योजनेपर्यंत राबवायचे, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

मासळी उतरविण्यात येणारी केंद्रे

जिल्ह्यात मासेमारी मोठ्या प्रमाणात केली जाते. या व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनाने पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील आंबोळगड, हेदवी, बुधल, पालशेत, असगोली, दाभोळ, पाजपंढरी, आंजर्ले, केळशी, वेसवी, बाणकोट या मासळी उतरविण्यात येणाऱ्या केंद्राचा विकास केला जाणार आहे.

Web Title: Development of 11 fish landing centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.