देवरुख नगर पंचायत विकसित करणार जलपर्यटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 04:06 PM2022-01-12T16:06:59+5:302022-01-12T16:07:28+5:30
नदी पात्रातील पाण्यावर छाेट्या फायबर बाेटी साेडून जल पर्यटन सुरु करण्याचा मानस देवरुख नगर पंचायतीचा आहे.
देवरुख : नगरपंचायत देवरुख यांनी शाळा नं. १ समोर सप्तलिंगी नदीवर घातलेल्या बंधाऱ्यामुळे नदीचे पाणी अडविण्यात आले आहे. त्यामुळे पाणी पातळीतही वाढ झाली आहे. नदी पात्रातील पाण्यावर छाेट्या फायबर बाेटी साेडून जल पर्यटन सुरु करण्याचा मानस देवरुख नगर पंचायतीचा आहे. त्यासाठी नगर परिषदेकडून चाचपणीही करण्यात आली.
नगर पंचायतीर्फे प्रायोगिक तत्वावर फुणगुस येथून फायबरची मोटर बोट आणण्यात आली होती. हा जलपर्यटनाचा प्रयोग यशस्वी झाला असून, येथे जल पर्यटनस्थळ विकसित करण्याचा निर्धार करण्यात आला. नागरिकांकडून अभिप्राय मागविण्यात आले आहेत. यावर सर्व बाजूंचा विचार करून असणाऱ्या त्रुटी दूर करून गतवर्षीपासून हे स्थळ सुरू करण्याचा मानस नगर पंचायतीने व्यक्त केला आहे.
नगर पंचायतीने ठराविक नागरिकांच्या उपस्थितीत जलबोट फेरीची चाचपणी केली. जल पर्यटनस्थळ विकसित करणाण्यासाठी नगर पंचायतीकडून ठोस पावले उचलली जाणार आहेत.