कृषी निविष्ठांच्या तक्रारीबाबत राबविणार धडक मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:33 AM2021-05-08T04:33:44+5:302021-05-08T04:33:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : तालुकास्तरावर गुणनियंत्रण कामासाठी तसेच कृषी निविष्ठांच्या तक्रारींबाबत धडक मोहीम राबविण्यात येणार आहे. कृषी आयुक्तांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : तालुकास्तरावर गुणनियंत्रण कामासाठी तसेच कृषी निविष्ठांच्या तक्रारींबाबत धडक मोहीम राबविण्यात येणार आहे. कृषी आयुक्तांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यातील एकूण नऊ तालुक्यांमध्ये भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
भरारी पथकाने कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेबाबत दक्ष राहून कार्यवाही करावी व तसा अहवाल वेळोवेळी कार्यालयांना, वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा तक्रारींबाबत धडक मोहीम राबविण्याकरिता जिल्ह्यात २०२१-२२साठी जिल्हास्तरीय भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा भरारी पथकाचे प्रमुख म्हणून जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी अजय शेंडे हे काम पाहणार आहेत.
उपविभागीय कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे (रत्नागिरी), प्रकाश सूर्यवंशी (चिपळूण), दीपक कुटे (दापोली), जिल्हा परिषद मोहीम अधिकारी एस. एस. पंडित, वैधमापनशास्त्र निरीक्षक मनोज मोदी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जी. आर. मुरकुटे यांची निवड जिल्हा भरारी पथकात करण्यात आली आहे.