खेडमध्ये धनगरवाड्यांना पाणीटंचाईची सर्वाधिक झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:13 AM2021-05-04T04:13:46+5:302021-05-04T04:13:46+5:30

खेड : तालुक्यात ८ गावांतील ११ वाड्यांना तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाईची झळ धनगरवाड्यांनाच बसत ...

Dhangarwadas in Khed suffer the most from water scarcity | खेडमध्ये धनगरवाड्यांना पाणीटंचाईची सर्वाधिक झळ

खेडमध्ये धनगरवाड्यांना पाणीटंचाईची सर्वाधिक झळ

Next

खेड : तालुक्यात ८ गावांतील ११ वाड्यांना तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाईची झळ धनगरवाड्यांनाच बसत आहे. सद्य:स्थितीत ११ वाड्यांपैकी ५ धनगरवाड्यांतील ग्रामस्थ पाण्यासाठी टाहो फोडत आहेत. जलस्राेतांनी तळ गाठल्याने दुर्गम धनगरवाड्यांतील ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

तालुक्यात ४६ धनगरवाड्या असून, याच वाड्यांतून टँकरच्या पाण्यासाठी पहिला अर्ज

दरवर्षी येथील प्रशासनाकडे दाखल होतो. ही परिस्थिती यंदाही कायम असून खवटी-खालची धनगरवाडीत पाण्याचा पहिला टँकर धावला.

जलस्रोत आटल्याने व त्यातच लॉकडाऊन

असल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके बसत आहेत. त्यांची सारी मदार प्रशासनाकडून एकदिवसाआड होणाऱ्या टँकरवरच अवलंबून आहे. सद्य:स्थितीत खवटी-खालची, वरची धनगरवाडी, आंबवली-भिंगारा, तुळशी- कुबजई, खोपी-रामजीवाडी या धनगरवाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करून दिलासा देण्यात येत असला तरी पाण्याचे स्रोत तळ गाठत चालल्याने ग्रामस्थ रडकुंडीसच आले आहेत. लॉकडाऊन सुरू असल्याने एस.टी. बस बंद आहेत. याचमुळे टँकरच्या पाण्यासाठी अर्ज दाखल करण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात जायचे कसे, याची चिंता पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या अन्य धनगरवाड्यांना सतावत आहे.

निमणी-धनगरवाडीलाही टँकरने पाणी

तालुक्यातील निमणी-धनगरवाडी येथे

पाण्याचे भीषण दुर्भिक्ष्य निर्माण झाल्याने

टँकरच्या पाण्यासाठी अर्ज दाखल केला होता.

प्रशासनानेही तातडीने सर्वेक्षण करत

शुक्रवारपासून टँकरने पाणीपुरवठा करण्यास

सुरुवात केली आहे.

Web Title: Dhangarwadas in Khed suffer the most from water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.