‘इलेक्ट्रॉनिक्स’चा व्यवसायदेखील डिजिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 10:39 PM2019-04-29T22:39:38+5:302019-04-29T22:39:42+5:30

मेहरून नाकाडे । लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये नवीन गॅझेट्सना सर्वाधिक मागणी होत आहे. एलईडी टीव्ही, स्मार्ट ...

Digital Business 'Digital' also Digital Digital | ‘इलेक्ट्रॉनिक्स’चा व्यवसायदेखील डिजिटल

‘इलेक्ट्रॉनिक्स’चा व्यवसायदेखील डिजिटल

Next

मेहरून नाकाडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये नवीन गॅझेट्सना सर्वाधिक मागणी होत आहे. एलईडी टीव्ही, स्मार्ट फोन, टॅब, लॅपटॉप याबरोबरच इलेक्ट्रीक वस्तूंमध्ये एसी, फ्रीज, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह, कूलर आदी वस्तूंना अधिक मागणी होत आहे. वस्तू खरेदीसाठी सुलभ कर्जाची सुविधा उपलब्ध होत असल्याने ग्राहकांचा खरेदीकडे ओढा वाढला आहे. शिवाय रोखीने खरेदी करणाऱ्यांना सवलती मिळत आहेत. मात्र, इलेक्ट्रॉनिक्स खरेदीदेखील आता डिजिटल पध्दतीने सुरू झाली आहे.
गेल्या काही वर्षात ग्राहकांचा खरेदीकडे कल बºयापैकी वाढला आहे. वस्तू बदल करण्याच्या सुविधा उपलब्ध असल्याने ग्राहक त्याकडे आकर्षिले जात आहेत. मात्र, बहुतांश मंडळी नोकरदार असल्याने सुलभ हप्त्यावर वस्तू खरेदी करणे सोपे जाते. विविध बँका, फायनान्स कंपन्या, पतसंस्थांकडून कर्ज सुविधा उपलब्ध करून देत असल्याने बाजारपेठेतील उलाढाल वाढली आहे. याशिवाय काही ग्राहक रोखीने खरेदी करणारे आहेत. एटीएमच्या वापरावर असलेली मर्यादा शिवाय एकावेळी एटीएमव्दारे वस्तूच्या पूर्ण किमतीएवढी रक्कम येऊ शकत नसल्यामुळे ग्राहकांना विक्रेत्यांकडील पॉस मशीनवर कार्ड स्वाईप करणे सुलभ होत आहे. कार्ड स्वाईप करून खरेदी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, २५ ते ३० ग्राहक कार्डचा वापर करू लागले आहेत. याशिवाय कंपन्यादेखील कार्ड वापरणाºया ग्राहकांसाठी सवलती देत असल्याने डिजिटल व्यवहाराकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. काही कंपन्या, बँका हप्ते निश्चित करून व्याजदरात सवलत शिवाय कॅशबॅक आॅफर देत आहेत. खासगी क्षेत्रातील नोकरदार असो वा सर्वसामान्य ग्राहक असो, सर्वांसाठी ही सुविधा फायदेशीर ठरत असली तरी रोखीने व्यवहार करणाºयांसाठी लाभदायी आहे.

आर्थिक व्यवहारात पारदर्शकता यावी, यासाठी डिजिटल व्यवहाराला प्राधान्य देण्यात आले. कंपन्यादेखील बँका निश्चित करून त्याव्दारे ग्राहकांना कर्जसुविधा उपलब्ध करून देत आहेत. तीन, सहा, नऊ, बारा हफ्ते ग्राहकांसाठी त्यांच्या सोयीने देत असून, क्रेडीट कार्ड वापरणाºया ग्राहकांना शून्य टक्के व्याज दर, शिवाय खरेदीवर १ ते १५ टक्के कॅशबॅक आॅफर असल्याने डिजिटल खरेदीकडे ग्राहकांचा ओढा वाढत आहे. कॅशबॅक आॅफर ठराविक बँका देत असल्याने ग्राहक कार्डचा वापर करीत आहेत.
- प्रल्हाद लिमये, उल्हास एजन्सीज्, रत्नागिरी

Web Title: Digital Business 'Digital' also Digital Digital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.