थेट नगराध्यक्षपदाचे अनेकांना वेध

By admin | Published: May 11, 2016 11:09 PM2016-05-11T23:09:40+5:302016-05-11T23:57:14+5:30

वातावरण तापले : शेट्ये, कीर, मयेकर नावे चर्चेत

Directly directing many of the post of City President | थेट नगराध्यक्षपदाचे अनेकांना वेध

थेट नगराध्यक्षपदाचे अनेकांना वेध

Next

रत्नागिरी : राज्य शासनाने थेट नगराध्यक्ष निवडीचा निर्णय जाहीर केल्यानंतर रत्नागिरीत नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या पालिका निवडणुकीचे वातावरण अधिकच तापले आहे. कोण होणार नगराध्यक्ष, अशी चर्चा सुरू झाली असून, थेट नगराध्यक्ष निवड पध्दतीचा लाभ कोणाला होणार, याबाबत चर्चाही रंगली आहे. याआधी १९८५च्या थेट नगराध्यक्ष निवडणुकीत ज. शं. केळकर, तर २००१च्या थेट नगराध्यक्ष निवडणुकीत उमेश शेट्ये विजयी झाले होते. यावेळीही त्यांच्या उमेदवारीची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचे कडवे विरोधक मिलिंद कीर यांना त्यांच्याविरोधात उमेदवारी मिळणार काय, याबाबतही चर्चेला उधाण आले आहे.
रत्नागिरीत याआधी २८ वॉर्ड होते. मात्र, त्याचे आता ३० वॉर्ड करण्यात आले असून, त्याचे एकूण १५ प्रभाग होणार आहेत. शहरात सध्या शिवसेनेचे प्राबल्य आहे. त्यातच गेल्यावेळी भाजपने शिवसेनेला त्यांच्या हक्काचे नगराध्यक्षपद न दिल्याने दोन्ही पक्षांतील वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे भाजपबरोबर युती नकोच, अशी भूमिका सेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष निवडणुकीत खरे शत्रू ठरणार आहे.
भाजपतर्फे विद्यमान नगराध्यक्ष महेंद्र मयेकर पुन्हा इच्छूक आहेत, तर भाजपचे माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर यांचे नावही चर्चेत आहे. सेनेतर्फे नगरसेवक बंड्या साळवी, मिलिंद कीर, राहुल पंडित, राजन शेट्ये यांच्याबरोबरच उपजिल्हाप्रमुख राजेश सावंत यांचीही नावे थेट नगराध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची नावे चर्चेत असली तरी उमेश शेट्ये पुन्हा एकदा या शर्यतीत आहेत. (प्रतिनिधी)


महेंद्र मयेकरही इच्छुक
या थेट निवडणुकीत आपण इच्छुक आहात काय, असे विचारता नगराध्यक्ष महेंद्र मयेकर म्हणाले, गेल्या पावणेदोन वर्षात मी शहरात केलेली कामे पक्षाला माहीत आहेत. त्यामुळे या पदासाठी पक्षाला माझ्या नावाचा प्रथम प्राधान्याने विचार करावा लागेल, असे वाटते, असे सांगून या पदासाठी पुन्हा इच्छुक असल्याची कबुलीच त्यांनी दिली. मात्र, भाजपमध्ये गेल्यावेळी संधी हुकलेले अशोक मयेकर यांचे आव्हान ते कसे परतवणार, असा सवालही निर्माण झाला आहे.
शेट्ये प्रबळ दावेदार!
थेट नगराध्यक्ष निवडणुकीचा रत्नागिरीत त्याचा फायदा उमेश शेट्ये यांना सर्वाधिक होण्याची शक्यता आहे. याआधीच्या थेट नगराधध्यक्ष निवडणुकीत ते विजयी झाले होते. अशाच काहीशा गणितांसाठी त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडील उमेदवारीसाठी ते प्रबळ दावेदार ठरू शकतात.

Web Title: Directly directing many of the post of City President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.