अजूनही ५१ गावात चालक-वाहकांची गैरसोय
By admin | Published: February 9, 2015 10:46 PM2015-02-09T22:46:31+5:302015-02-10T00:01:54+5:30
एस. टी. महामंडळ : वस्तीला जाणाऱ्या गाडीच्या कर्मचाऱ्यांसमोर समस्या...
रत्नागिरी : परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातर्फे जिल्ह्यातील २०३ ठिकाणी रात्रवस्तीच्या फेऱ्या पाठवण्यात येतात. वस्तीची गाडी घेऊन जाणाऱ्या चालक - वाहकांना गावातील असुविधेचा सामना करावा लागतो. जिल्ह्यातील २०३ गावांपैकी १५२ गावांमध्ये शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, अजूनही ५१ गावांमध्ये चालक-वाहकांची गैरसोय होत आहे.मंडणगड तालुक्यातील आवाशी, केळशी, पणदेरी मोहल्ला, भोळवली, उन्हवरे, खेड तालुक्यातील चोरवणे, शिरगाव, म्हाप्रळ, पोफळवणे, पन्हाळजे, तुळशी, बिरमणी, अकल्पे, सवणस, चिपळूण तालुक्यातील माखजन, वाघिवरे, स्वयंदेव, गांग्रई, वीर, कासई, चिखली, करंबणे, धायजेवाडी, तळवडे-गोवळ, खोपी-शिरगाव, मोरेवाडी, तिवडी, कोसबी, मालदोली, दुर्गवाडी, कुरवळजावळी, मूर्तवडे, नायशी वडेरू, पातेपिलवली, गुढे कोंडवी, सावर्डे, पाचांबे, तळसर, तोंडली, नांदिवसे, ताम्हणमळा, गुहागर तालुक्यातील मालगुंड, पांगरी, पाभरे, संगमेश्वर तालुक्यातील पिरदंवणे, आंबवली, करजुवे, कानरकोंड, कातुर्डी, निवळी नेदरवाडी, देवडे, तांबेडी, मुचरी, बामणोली, खडीकोळवण, ओझरे, मासरंग, फणसवळे, नायरी, तिवरे, चाफवली भटाचा कोंड, कुळ्ये पुनवर्सन, पाचांबे येडगेवाडी, बडदवाडी, धामापूर कुरजुवे, कासे, पेढांबे, तळेकांटे गावामध्ये अद्याप शौचालय सुविधा उभारण्यात आलेली नाही. लांजा तालुक्यातील घाटीवळे, गावडेआंबेरे, झर्ये, आजिवली, कोतापूर, इसवली, इंदवटी, कशेळी कोंडे, तर राजापूर तालुक्यातील भालवली, कुंभवडे, ताम्हाणे, चुनाकोळवण, नाणार, मोरोशी, तुळसुंदे, शिरसे, हातदे, वेत्ये, घाडीवाडी, काजिर्डा, जैतापूर, बुरंबेवाडी, भालावली गावात अद्याप असुविधा आहे. रत्नागिरी तालुक्यातील ३४ गावांपैकी २९ गावांनी शौचालयांची सुविधा उपलब्ध केली आहे. पूर्णगड, गावखडी, नाखरे खांबड, चांदोर, नाखरेस्वामी, गावखडी, गणेशगुळे, वरवडे, कोतवडे, वळके, जांभरूण, जयगडबंदर, वेळवंड, रीळउंडी, जांभारी, धामणये वरचे वरवडे, करबुडे - काजरेकोंड, देऊड, कुरतडे - तोणदे, करबुडे, सोमेश्वर तोणदे, खरवते, मालगुंड, डोर्ले, निरूळ - रिंगीची वाडी, वेतोशी, भोके - आंबेकरवाडी व मठवाडी येथे चालक - वाहकांसाठी प्रसाधनगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.अद्याप ५१ गावांमध्ये प्रसाधनगृहाची असुविधा आहे. जिल्हा परिषदेकडून अनेक गावे हागणदारीमुक्त करण्यात येत असताना प्रसाधनगृहांचा अभाव दिसून येत आहे. वेळोवेळी एस. टी. कर्मचारी संघटनांनी आंदोलन पुकारून मागणीकडे लक्ष वेधले होते. पैकी रत्नागिरी पंचायत समितीने याची दखल घेत अंमलबजावणी केल्याने तालुक्यातील ३४ गावांपैकी २९ गावांनी प्रसाधनगृहाची सुविधा उभारली आहे. (प्रतिनिधी)