आपत्ती व्यवस्थापन; महावितरण नापास

By admin | Published: June 9, 2015 11:00 PM2015-06-09T23:00:46+5:302015-06-10T00:29:22+5:30

नाराजी : पावसाला काही तासच बाकी

Disaster Management; Mahavitaran naap | आपत्ती व्यवस्थापन; महावितरण नापास

आपत्ती व्यवस्थापन; महावितरण नापास

Next

चिपळूण : महावितरण कंपनीने पावसाळापूर्व आपत्ती व्यवस्थापनाची कामे पूर्ण केली आहेत. तरीही पावसाळ्यापूर्वीच सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याने महावितरण आपल्या कामात नापास झाले आहे.
पावसाळा जवळ आला की, पावसाळ्यापूर्वी आवश्यक ती डागडुजी व उपाययोजना केली जाते. आपत्ती व्यवस्थापनाच्या नावाखाली अत्यावश्यक असणारी कामे पूर्ण करुन घेतली जातात. यावर्षी तर शहरातील विजेचे खांब बदलणे, ट्रान्सफार्मर बदलणे, नवीन विद्युत वाहिनी टाकणे, यासाठी गेले कित्येक दिवस वीज पुरवठा खंडित केला जात होता. ग्राहकांना वेठीस धरुन ही कामे पूर्ण करण्यात आली.
महावितरणने आपली कामे पूर्ण करुनही शहरात अद्याप अनेकवेळा वीज पुरवठा खंडित होतो. मे व जून महिन्याच्या कालावधीत मार्कंडी, काविळतळी, परशुरामनगर, रावतळे ते अगदी रेल्वेस्टेशनपर्यंतच्या परिसरात तीन वेळा अंधाराचे साम्राज्य होते. त्यामुळे या परिसरातील ग्राहक हैराण आहेत.
सोमवारी रात्री २ वाजता रावतळे परिसरात विजेच्या तारांवर झाडाची फांदी पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर युनायटेड इंग्लिश स्कूल येथेही अडचण निर्माण झाली होती. रात्री २ वाजल्यापासून पहाटेपर्यंत वीज पुरवठा खंडित होता. सातत्याने चौकशी करुनही फॉल्ट अद्याप मिळाला नाही, असेच उत्तर दिले जात होते. अजून आपत्ती खऱ्या अर्थाने सुरू व्हायची आहे. एकंदरीत महावितरणच्या सुलतानशाही कारभाराचा फटका वेगवेगळ्या मार्गाने नागरिकांना बसत आहे. बिलाच्या दरवाढीचे चटके असह्य होत असतानाच सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याने महावितरणबाबत नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. याबाबत नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. महावितरण कंपनीने वेळीच आपला कारभार सुधारावा, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)

ग्राहकांना धरले जातेय वेठीस
पावसाळा जवळ आल्यानंतर प्रत्येक खाते जागे होते. आरोग्य, वीज, बांधकाम ही खाती पटलावर असतात. चिपळूण शहरात महावितरण कंपनीद्वारे शहरातील डागडुजी व उपाययोजना केली जाते. धोकादायक खांब बदलणे, नवीन वाहिनी टाकणे यांसाठी शहरात गेले कित्येक दिवस वीज पुरवठा खंडित करण्यात येत होता. ग्राहकांना यासाठी वेठीस धरण्यात आल्याचा आरोप काहिनी केला आहे. कामे करूनही महावितरण ग्राहकांच्या परीक्षेत नापास झाल्याची चर्चा होत आहे.

Web Title: Disaster Management; Mahavitaran naap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.