गणपतीपुळे येथील लॉजिंग, हॉटेल्स सुरू करण्याबाबत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:20 AM2021-07-12T04:20:33+5:302021-07-12T04:20:33+5:30

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील लॉजिंग, हॉटेल व इतर व्यवसाय सुरू करण्यासाठी हॉटेल ...

Discussion on starting lodging, hotels at Ganpatipule | गणपतीपुळे येथील लॉजिंग, हॉटेल्स सुरू करण्याबाबत चर्चा

गणपतीपुळे येथील लॉजिंग, हॉटेल्स सुरू करण्याबाबत चर्चा

Next

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील लॉजिंग, हॉटेल व इतर व्यवसाय सुरू करण्यासाठी हॉटेल व्यवस्थापन संघटना, ग्रामपंचायत सदस्य व हाॅटेल असोसिएशन यांच्यामध्ये चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये गणपतीपुळेत येणारे पर्यटक बंदमुळे माघारी फिरत असल्याने लवकरच हाॅटेल व्यवसाय सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

गणपतीपुळे येथील पर्यटन व्यवसाय गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. गणपतीपुळे मंदिर बंद असल्यामुळे परिसरातील पर्यटन व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. गेल्या दीड वर्षापासून येथील पर्यटनाला खीळ बसली आहे. तसेच पर्यटनावर अवलंबून असलेले छोटे-मोठे व्यवसाय व कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत रत्नागिरीचे जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा व्यवसाय सुरू करताना कोरोनाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोर पालन करण्याचे ठरविण्यात आले. तसेच येथील पर्यटन व्यवसायातील कर्मचारी व व्यवस्थापनातील सर्वांचे लसीकरण करण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली.

Web Title: Discussion on starting lodging, hotels at Ganpatipule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.