उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस हिदायत नाईक यांची हकालपट्टी

By अरुण आडिवरेकर | Published: June 26, 2023 06:49 PM2023-06-26T18:49:20+5:302023-06-26T18:49:42+5:30

प्रशांत सुर्वे मंडणगड : संघटनेच्या विरोधात काम केल्याने उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस हिदायत नाईक यांची पदावरून हकालपट्टी करण्यात ...

Dismissal of Hidayat Naik District General Secretary of Urdu Teachers Association | उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस हिदायत नाईक यांची हकालपट्टी

उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस हिदायत नाईक यांची हकालपट्टी

googlenewsNext

प्रशांत सुर्वे

मंडणगड : संघटनेच्या विरोधात काम केल्याने उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस हिदायत नाईक यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

संघटनेचे राज्य सचिव ताजुद्दीन परकार यांच्या अध्यक्षतेखाली खेड येथे जिल्हाध्यक्ष मुश्ताक तांबे यांच्यासह रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीच्या उपस्थितीत दि. २५ जून २०२३ रोजी बैठक घेण्यात आली. या बैठकीत संघटनेचे जिल्हा सरचिटणीस हिदायत नाईक यांची संघटना विरोधी काम केल्याने पदावरून हकालपट्टी करण्याची कार्यवाही करण्यात आली. जिल्हा सरचिटणीस हे संघटना विरोधी काम करीत असून, शिक्षक पतपेढीच्या निवडणुकीत संघटना विरोधी भूमिका घेतली आहे.

तसेच राज्य, जिल्हा व तालुका कार्यकारिणीच्या आदेशांचे पालन करीत नसल्याने दि. २८ मे २०२३ रोजी झालेल्या ऑनलाइन सभेत कोअर कमिटीने संघटना विरोधी भूमिका सोडून संघटनेच्या हिताचे काम करावे. अन्यथा आपल्याला संघटनेच्या ध्येयधोरणानुसार व घटनेतील कलम ८ क मुद्दा क्रमांक ३ व ४ नुसार संघटनेतून प्राथमिक सदस्यत्व रद्द करून कायमस्वरूप बाहेर काढण्यात येईल, अशी नोटीस दिली होती.

या नाेटीसच्या २५ दिवसांनतरही हिदायत नाईक आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने संघटनेच्या प्राथमिक सदस्यत्व पदावरून तसेच जिल्हा सरचिटणीस पदावरून कायमस्वरूपी काढण्यात आले. त्यामुळे या पुढील काळात नाईक यांचा संघटनेशी कोणताही संबंध राहणार नसल्याने संघटनेने स्पष्ट केले आहे.

खेड येथे पार पडलेल्या या सभेला राज्य सरचिटणीस ताजुद्दीन परकार, जिल्हाध्यक्ष मुश्ताक तांबे, कोकण विभाग उपाध्यक्ष बशीर नागुठणे, जिल्हा उपाध्यक्ष इकबाल दळवी, कोषाध्यक्ष आसिफ मुरुडकर, खेड तालुकाध्यक्ष अश्वलाक अहमद परकार, सचिव खलील अहमद परकार, चिपळूण तालुकाध्यक्ष हुसैन खान, जिल्हा संघटक खलील ऐनरकर, दापोली तालुकाध्यक्ष शौकत ऐनरकर, राजापूर तालुका सचिव अ. अलीम करबेलकर, मंडणगड तालुकाध्यक्ष बशीर परकार, अब्दुल्ला वावघरकर, नूरमोहम्मद चैगुले, अ. रेहमान परकार, मोहमंद शेख, मसालीम कारभारी उपस्थित हाेते.

Web Title: Dismissal of Hidayat Naik District General Secretary of Urdu Teachers Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.