राजापुरात पालखी नेण्यावरून दोन गटांत वाद, ४१ जणांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 04:55 PM2022-03-21T16:55:29+5:302022-03-21T16:56:42+5:30

डोंगर गावात शिमगोत्सवातील मानपानावरून गुरव विरुद्ध शेलार, अशा दोन गटांत मागील काही वर्षांपासून वाद आहे.

Dispute between two groups over taking palanquin to Rajapur, 41 cases filed against them | राजापुरात पालखी नेण्यावरून दोन गटांत वाद, ४१ जणांविरोधात गुन्हा दाखल

राजापुरात पालखी नेण्यावरून दोन गटांत वाद, ४१ जणांविरोधात गुन्हा दाखल

Next

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील डोंगर गावात शिमगोत्सवातील पालखी नेण्यावरून दोन गटांत वाद झाला. याप्रकरणी राजापूर पोलीस स्थानकात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आली असून, दोन्ही गटांतील ४१ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

डोंगर गावात शिमगोत्सवातील मानपानावरून गुरव विरुद्ध शेलार, अशा दोन गटांत मागील काही वर्षांपासून वाद आहे. शुक्रवारी शिमगोत्सवानिमित्त पालखी नेण्यासाठी दोन्ही गट ग्रामदेवतेच्या मंदिरात एकत्र जमले असताना पालखी नेण्यावरून दोन्ही गटांत वाद निर्माण झाला. या वादातून दोन्ही गटांकडून एकमेकांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर दोन्ही गटांकडून राजापूर पोलीस स्थानकात परस्परविरोधी फिर्याद देण्यात आली.

राजापूर पोलिसांनी गुरव व शेलार अशा दोन्ही गटातील ४१ जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मधुकर मौळे करीत आहेत. या सर्वांना रत्नागिरी न्यायदंडाधिकारी वर्ग १ यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली.

Web Title: Dispute between two groups over taking palanquin to Rajapur, 41 cases filed against them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.