पालखीच्या वाटेवरून वाद, चिपळुणात एकावर खूनी हल्ला; शिमगोत्सवाच्या बैठकीतच घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 03:38 PM2022-03-11T15:38:23+5:302022-03-11T16:08:20+5:30

शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाग परिसरातील एका मंदिरात गावची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत भोजने यांच्या दोन कुटुंबातील वाटेवरून सुरु असलेला वाद उफाळून आला.

Dispute on the way to Palkhi, murderous attack on one in Chiplun | पालखीच्या वाटेवरून वाद, चिपळुणात एकावर खूनी हल्ला; शिमगोत्सवाच्या बैठकीतच घडला प्रकार

पालखीच्या वाटेवरून वाद, चिपळुणात एकावर खूनी हल्ला; शिमगोत्सवाच्या बैठकीतच घडला प्रकार

Next

चिपळूण : काही दिवसांवरच शिमगोत्सव येऊन ठेपला असून सर्वत्र त्याची धामधूम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विविध देवस्थानच्या बैठका सुरु झाल्या आहेत. शहरातील पाग परिसरातील एका मंदिरात बैठक सुरू असताना पालखीच्या वाटेवरून वाद झाला आणि त्यातून एकावर खूनी हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. हल्ला झालेली व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. याप्रकारानंतर गावात एकच खळबळ उडाली.

गेली दोन वर्ष कोरोनाच्या परिस्थितीमुळे सर्वत्र शिमगोत्सवावर निर्बंध होते. त्यामुळे अनेक ठिकाणी साध्या पद्धतीने तर काही ठिकाणी उत्सव साधना करतात मंदिरातच शिमगोत्सव साजरा करावा लागला होता. मात्र आता कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याने सर्वत्र शिमगोत्सवाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. या उत्सवासाठी मुंबई, पुण्यातील चाकरमानी देखील कोकणच्या दिशेने येण्यास सुरुवात झाली आहे. शिवाय देवस्थान मार्फत शिमगोत्सवाची तयारी केली जात आहे.

शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाग परिसरातील एका मंदिरात गावची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत भोजने यांच्या दोन कुटुंबातील वाटेवरून सुरु असलेला वाद उफाळून आला. या वादा विषयी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. मात्र शिमगोत्सवानिमित्त पालखीची वाट मोकळी करावी अशी मागणी एका कुटुंबाने केली.

या रागातून एकाने चक्क त्याच्याच चुलत भावाच्या पोटात चाकू सारख्या धारदार हत्याराने वार केला. या प्रकारामुळे बैठकीला असलेले सर्व ग्रामस्थ भयभीत झाले होते. तर परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हल्ला झालेली व्यक्ती गंभीरपणे जखमी झाला आहे. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलीस स्थानकात दोघांवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Dispute on the way to Palkhi, murderous attack on one in Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.