राजापुरात पोलिसांच्या सततच्या कारवाईमुळे नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:21 AM2021-06-17T04:21:58+5:302021-06-17T04:21:58+5:30

राजापूर : गेले सव्वा वर्ष सुरू असलेले कोरोनाचे संकट आणि त्यामुळे निर्माण झालेली लॉकडाऊनची परिस्थिती यात सर्वसामान्य जनता पुरती ...

Dissatisfied with the continuous action of the police in Rajapur | राजापुरात पोलिसांच्या सततच्या कारवाईमुळे नाराजी

राजापुरात पोलिसांच्या सततच्या कारवाईमुळे नाराजी

Next

राजापूर : गेले सव्वा वर्ष सुरू असलेले कोरोनाचे संकट आणि त्यामुळे निर्माण झालेली लॉकडाऊनची परिस्थिती यात सर्वसामान्य जनता पुरती बेजार झाली आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर दैनंदिन व्यवहार सुरळीत होत असतानाही पोलिसांकडून व्यापारी, नागरिकांवर २७९ कलमान्वये वारंवार केल्या जात असलेल्या कारवाईबाबत जनतेमधून नाराजी व्यक्त होत आहे. विनाकारण गर्दी जमविणारे लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष करून कायम सर्वसामान्य जनतेवरच कारवाई केली जात असल्याने पोलीस प्रशासनाचा नेमका हेतू काय, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

गेले सव्वा वर्ष कोरोना आणि लॉकडाऊनच्या परिस्थितीत लोकांनी नियम, अटींचे पालन करत प्रशासनाला सहकार्य केले. मात्र, नियोजनशून्य कारभारामुळे कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. कडक लॉकडाऊननंतरही राजापूर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग कमी झालेला नाही. आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर दैनंदिन कामकाजासाठी राजापूर बाजारपेठेत येणाऱ्या सर्वसामान्य लोकांना नाहक पोलीस कारवाईला सामोरे जावे लागत आहे. अँटिजन चाचणीलाही सामोरे जावे लागत आहे.

सद्यस्थितीत पोलीस आरोग्य विभागाच्या सहकार्यातून जणू धरपकड मोहीमच राबवत आहेत, अशी स्थिती आहे. बाजारात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला पकडून त्याची अँटिजन चाचणी करण्याचा सपाटाच लावण्यात आला आहे. त्यामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

Web Title: Dissatisfied with the continuous action of the police in Rajapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.