आरोग्य, पोलीस, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ४० हजार मास्कचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:22 AM2021-06-10T04:22:09+5:302021-06-10T04:22:09+5:30
रत्नागिरी : इंटरनॅशनल असोसिएशन फाॅर ह्युमन व्हॅल्यूज आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या येथील शाखेकडून आरोग्य, पोलीस आणि अन्य शासकीय कर्मचारी ...
रत्नागिरी : इंटरनॅशनल असोसिएशन फाॅर ह्युमन व्हॅल्यूज आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या येथील शाखेकडून आरोग्य, पोलीस आणि अन्य शासकीय कर्मचारी तसेच रुग्ण यांच्यासाठी ४० हजार ट्रीपल लेअर मास्कचे वाटप करण्यात आले.
इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्यूज आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्याकडून रत्नागिरी जिल्ह्यातील विविध कार्यालयातील कर्मचारी वर्गासाठी ४० हजार ट्रिपल लेअर मास्कचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व आरोग्य विभागासाठी व कोविड पेशंटसाठी, सिव्हिल हॉस्पिटल २० हजार मास्क, रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी वर्गासाठी १० हजार मास्क आणि आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद यांना १० हजार मास्कचे वाटप करण्यात आले. त्यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे डी. डी. मी. मेंबर्स ओंकार फडके, प्रमोद खेडेकर आणि प्रवीण लाड उपस्थित होते.
हे मास्क जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी बबिता कमलापूरकर आणि अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.