मनसेतर्फे ज्येष्ठ नागरिकांना बॉटल्सचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:32 AM2021-03-18T04:32:04+5:302021-03-18T04:32:04+5:30
खेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांना कोल्ड अँड हॉट बॉटल्सचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ...
खेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांना कोल्ड अँड हॉट बॉटल्सचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, माजी तालुकाध्यक्ष शरद शिर्के, वैभवी खेडेकर, गटनेते भूषण चिखले, उपशहराध्यक्ष बाबू नांदगावकर, मनविसेचे माजी जिल्हाध्यक्ष नंदू साळवी, ऋषिकेश कानडे, प्रसाद शेट्ये, गणेश बेलोसे, केतन आंब्रे, रहिम सहीबोले उपस्थित होते.
धामणदिवीत क्रिकेट स्पर्धा
खेड : धामणदिवी येथील सुबोध सकपाळ मित्रमंडळाच्या वतीने २८ व २९ मार्च रोजी प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्याला १०,०२१ रुपये, उपविजेत्याला ५,०२१ रुपये व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. इच्छुकांनी सुबोध सकपाळ, शिशीर सकपाळ, संग्राम जाधव यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
धामणवणे शाळेला भेट
चिपळूण : धामणवणे येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ साठी शैक्षणिक उठावअंतर्गत गोवा येथील श्री साई स्वाध्याय मंडळाकडून एक लाख तेरा हजारांची देगणी देण्यात आली. यासाठी रत्नागिरीतील देशपांडे, प्रकाश पाध्ये यांचे सहकार्य लाभले.
धान्य वाटप नाही
खेड : तहसील कार्यालयाच्या अन्नधान्य पुरवठा विभागामार्फत शहरासह ग्रामीण भागातील रास्त दर धान्य दुकानांद्वारे शिधापत्रिकाधारकांना दर महिन्याला वाटप केले जाणारे धान्य मार्च महिन्याचा पंधरवडा उलटला तरी अद्याप वाटप करण्यात आलेले नाही. धान्य वाटपाच्या ऑनलाईन पॉस मशीनमध्ये धान्य वाटपासंबंधी आकडेवारी समाविष्ट न झाल्याने धान्य वाटप होत नसल्याची बाब पुढे आली आहे. तालुक्यात १२७ रेशन दुकाने असून, ग्रामीण भागात ११२, तर शहरात ५ दुकानांचा समावेश आहे.
उत्सव साधेपणाने
रामपूर : रामपूर भागातील महाशिवरात्र साधेपणाने साजरी करण्यात आली. श्री केदारनाथ मंदिर, देवखेरकी येथे अमृतेश्वर, पाथर्डी येथे पार्थेश्वर चिखली शंकराचे मंदिर, गुढे येथे बामणेश्वर, कामोळी शंकर महादेव मंदिर वाघिवरे, वाघेश्वर बोरगाव - महाबळेश्वर चिवेली, व्याडेश्वर नीतभैरव, गोंधवे हरिहरेश्वर, मार्गताम्हाणे पद्मावती मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त लघुरुद्र, अभिषेक, पूजा, सत्यनारायण पूजा, हरिपाठ, कीर्तन, भजन, पालखी प्रदक्षिणा, धार्मिक कार्यक्रम अत्यंत साधेपणाने करण्यात आला.
जागतिक ग्राहक दिन
चिपळूण : संजीवनी डी. एम. एल. टी. नर्सिंग कॉलेज व लायन्स क्लब यांच्यातर्फे जागतिक ग्राहक दिन प्रशिक्षण संस्था येथे साजरा केला. लायन्स क्लब अध्यक्ष चंद्रकांत मांडवकर तसेच संजीवनी संस्थेचे अध्यक्ष जगदीश वाघुळदे उपस्थित होते. मांडवकर यांनी जागतिक दिनाचे महत्त्व तसेच ग्राहकांचे हक्क, कर्तव्य आदी विषयांवर मार्गदर्शन केले. संस्थेच्या प्राचार्या संध्याराणी नांदगावकर, निकिता झगडे, आदिती पटवर्धन यांच्यासह डी. एम. एल. टी. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.