आरेकर प्रतिष्ठानतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:33 AM2021-09-25T04:33:25+5:302021-09-25T04:33:25+5:30
असगाेली : तालुक्यातील धोपावे येथे स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागरतर्फे २२ गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या ...
असगाेली : तालुक्यातील धोपावे येथे स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागरतर्फे २२ गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला धोपावे ग्रामविकास मंडळाने सर्वप्रकारचे सहकार्य केले.
स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागरने यावर्षी तालुक्यातील कोविड पालक अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये २०० गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. या उपक्रमासाठी श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था सहकार्य करत आहेत. धोपावे ग्रामविकास मंडळ मुंबईचे कार्यकर्ते अनिल भुवड, लक्ष्मण भेकरे, आशीर्वाद पावसकर, भालचंद्र निमकर यांनी गावातील विद्यार्थ्यांची निवड प्रतिष्ठानच्या निकषांनुसार केली.
या कार्यक्रमाला धोपावेचे सरपंच सदानंद पवार, स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागरचे साहिल आरेकर, धोपावे ग्रामविकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष अनिल चव्हाण, सरचिटणीस अनिल भुवड, खजिनदार प्रकाश डावळ, लक्ष्मण भेकरे, बलवंत पवार, अक्षता भुवड, जेष्ठ कार्यकर्ते रामचंद्र डावल, मोहन पवार, अनंत डावल, शाळेचे मुख्याध्यापक लोखंडे, आशीर्वाद पावसकर, भालचंद्र निमकर उपस्थित होते. कार्यक्रम आयोजनामध्ये माता रमाई महिला मंडळ, बौध्दवाडीच्या सदस्या संध्या पवार, रचना जाधव तसेच विकास जाधव आणि मध्यवर्ती समितीचे सदस्य मनोज पवार यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल भुवड यांनी केले. तर लक्ष्मण भेकरे यांनी सर्वांचे आभार मानले.