शेताच्या बांधावरच खतांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:21 AM2021-06-11T04:21:39+5:302021-06-11T04:21:39+5:30

रत्नागिरी : कोरोनामुळे लाॅकडाऊन असून, शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी शासनाकडून शेताच्या बांधावर खतांचे वाटप करण्यात येत आहे. तालुका ...

Distribution of fertilizers only on field bunds | शेताच्या बांधावरच खतांचे वाटप

शेताच्या बांधावरच खतांचे वाटप

Next

रत्नागिरी : कोरोनामुळे लाॅकडाऊन असून, शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी शासनाकडून शेताच्या बांधावर खतांचे वाटप करण्यात येत आहे. तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली दांडेआडोम, भावेआडोम येथील शेतकऱ्यांना खतांचे वितरण करण्यात आले.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतांची आवश्यकता भासत असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांकडून आगाऊ खतांची मागणी नोंदविण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे सात टन युरिया व तीन टन सुफला खताचे वाटप करण्यात आले.

भात पिकाची उत्पादकता वाढावी, यासाठी मृदा आरोग्यपत्रिकेप्रमाणे खतांचा वापर करून दहा टक्के रासायनिक खताच्या बचतीसाठी शेणखत, गांडूळखत, कंपोस्टखत, हिरवळीच्या खतांचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी पर्यवेक्षक लक्ष्मीकांत मांडवकर यांनी मार्गदर्शन केले. कृषी सहाय्यक गणेश जुवळे यांनी खतांचे वाटप योग्य पध्दतीने व्हावे, यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: Distribution of fertilizers only on field bunds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.