महिलांना फोल्डरचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:30 AM2021-03-19T04:30:21+5:302021-03-19T04:30:21+5:30

साखरपा : येथील आरोग्य सहाय्यक दत्तात्रय भस्मे यांच्या सहकार्याने स्वखर्चातून साखरपा आरोग्य केंद्रातील महिला कर्मचाऱ्यांना फाईल फोल्डरचे वाटप करण्यात ...

Distribution of folders to women | महिलांना फोल्डरचे वाटप

महिलांना फोल्डरचे वाटप

Next

साखरपा : येथील आरोग्य सहाय्यक दत्तात्रय भस्मे यांच्या सहकार्याने स्वखर्चातून साखरपा आरोग्य केंद्रातील महिला कर्मचाऱ्यांना फाईल फोल्डरचे वाटप करण्यात आले. माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी आरोग्य केंद्राचे डॉ. पी. बी. अदाते तसेच अन्य कर्मचारी उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिक संघ कार्यक्रम

रत्नागिरी : शहरानजीकच्या कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वरच्या मजल्यावरील सभागृहाचे उद्घाटन व नामकरण कार्यक्रम २० रोजी आयोजित केला आहे. सकाळी १० ते १ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. २१ रोजी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी याच वास्तूत वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे, असे अध्यक्ष मारुती आंब्रे यांनी कळविले आहे.

मास्क कारवाईला वेग

रत्नागिरी : कोरोनाच्या अनुषंगाने वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने मास्क सक्ती केली आहे. मात्र याकडे नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. लोकांनी मास्कचा नियमित वापर करावा यासाठी आता पोलिसांकडून विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.

विद्यार्थी आरोग्य तपासणी

रत्नागिरी : येथील मदरशा - तुस - सुफ्फाच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात नेत्रचिकित्सा, दंतचिकित्सा, श्रवणदोष, त्वचा रोग, मानसोपचार चिकित्सा आदींचा समावेश होता. यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, इम्रान सय्यद, सागर बने यांचे सहकार्य लाभले.

शिमगोत्सव साधेपणाने

रत्नागिरी : तालुक्यातील जांभारी गावचा भैरी देवाचा शिमगोत्सव कोरोनाच्या अनुषंगाने यावर्षी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय भैरी देव देवस्थानने घेतला आहे. परिसरातील गावातून येणाऱ्या भाविकांनी यावर्षी शिमगोत्सवास येऊ नये, तसेच पाडव्यापर्यंत पालखी मांडावर असल्याने शिमगोत्सवानंतर कधीही गर्दी टाळून दर्शन घ्यावे, असे आवाहनही केले आहे.

कलाकारांचे नुकसान

रत्नागिरी : कोरोनाच्या अनुषंगाने गेले वर्षभर रत्नागिरीत नमन खेळे, जाकडी आदी लोककला थांबल्या आहेत. कार्यक्रमच थांबल्याने या क्षेत्रातील कलाकारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कोरोना संकट वाढल्याने पुन्हा कडक नियमावली करण्यात आल्याने कार्यक्रम पुन्हा रद्द होत आहे. त्यामुळे या कलाकारांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.

उरुस साधेपणाने

दापोली : संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला तालुक्यातील उटंबर येथील हजरत पीज बाबा याकूब यांचा २० मार्च रोजी उरुस साजरा होणार आहे. मात्र सध्या कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने हा उरुस साध्या पद्धतीने ५० माणसांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार आहे. यानिमित्त नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करुन केवळ धार्मिक विधीच होणार आहेत.

वहाळाची सफाई

लांजा : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन येथील काँग्रेसच्या नगरसेविका मधुरा लांजेकर यांनी आपल्या प्रभागातून वहाळाची जेसीबीच्या सहाय्याने साफसफाई केली. या वहाळातील दूषित पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. परंतु सफाई केल्याने दुर्गंधी कमी झाली आहे.

वाढीव वीजबिले

खेड : तालुक्यातील खाडी पट्टा भागात दामदुपटीने वीजबिले येऊ लागली आहेत. अनेक ग्रामस्थांना तब्बल ४० ते ५० हजार रुपयांची वीजबिले दिली गेल्याने ग्रामस्थ चक्रावून गेले आहेत. वाढीव बिले महावितरणने कमी करुन द्यावीत अन्यथा महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढावा लागेल असा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांसाठी वेबिनार

रत्नागिरी : पुढील महिन्यात १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होणार आहेत. या अनुषंगाने मुलांशी संवाद साधण्यासाठी प्रभावी मार्ग या विषयावर सुयोग पेणकर यांच्या पुढाकाराने २८ मार्च रोजी मोफत वेबिनार आयोजित केला आहे. सायंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या या वेबिनारमध्ये गीता ज्ञानी मार्गदर्शन करणार आहेत.

Web Title: Distribution of folders to women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.