विविध मराठा संघटनांतर्फे पूरग्रस्तांना वस्तूंचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:35 AM2021-08-12T04:35:35+5:302021-08-12T04:35:35+5:30
आरवली : सामाजिक बांधिलकी म्हणून मुंबई, विरार, ठाणे, नाशिक येथील शिवसंग्राम संघटनेतर्फे इतरही काही संघटनांना सोबत घेऊन पूरग्रस्तांसाठी चिपळूण ...
आरवली : सामाजिक बांधिलकी म्हणून मुंबई, विरार, ठाणे, नाशिक येथील शिवसंग्राम संघटनेतर्फे इतरही काही संघटनांना सोबत घेऊन पूरग्रस्तांसाठी चिपळूण व आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अन्नधान्य, कपडे, व इतर साहित्याची मदत करण्यात आली. या संघटनांतर्फे सुमारे १,५०० लोकांना ही मदत देण्यात आली.
चिपळूण परिसरातील बाजारपेठ, खेर्डी, दळवटने, पोसरे, मोरेवणे, मार्कंडी, पवन तलाव, वडनाका, कुंभारखाणी आणि कोयना परिसरातील मिरवाडी व इतर गावांना यावेळी प्रत्यक्ष भेट देऊन मदत देण्यात आली. यावेळी शिवसंग्रामचे विक्रांत आंब्रे, हिंदुराव जाधव, प्रफुल्ल पवार, सुनील निकम उपस्थित हाेते, तसेच क्षत्रिय मराठा संघटनेचे रूपेश मांजरेकर, चंद्रकांत चाळके, आनंद पाटील, संजय पाटील, जयसिंग खबाले, मिलिंद चव्हाण, बापू कदम यांच्यासह जिद्दी मावळा संघटनेच्या पूनम पाटील, कपिल गणात्रा, रंजना खुमाण, अश्विनी घाडगे, सेल्वी सिलम यांनी सहकाऱ्यांसोबत मदत वाटपात प्रत्यक्ष सहभाग घेतला.
त्याचबरोबर, आमदार भरती लव्हेकर, सुनील खाड्ये, विवेक सावंत, पुंडलिक मालुसरे, विजय राणे, सुजय पाटील, प्रकाश गावडे, नारायण गावकर, विजय मुळीक, हरी राऊळ, मंगेश घाग यांनी या कार्यात सहकार्य केले. या मदत कार्यात शिवसंग्राम, क्षत्रिय मराठा संघटन, जिद्दी मावळा फाउंडेशन, व्ही. एम. सावंत चॅरिटेबल ट्रस्ट, सकल मराठा समाज वसई-विरार या संघटनांचे सहकार्य लाभले. ही मदत वाटण्यासाठी रूपेश रहाटे, राजेंद्र भोजने, राजू रेडीज यांनीही सहकार्य केले.