चिपळुणातील पाच गावांमध्ये हायपोक्लोराइड लिक्विडचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:32 AM2021-05-09T04:32:41+5:302021-05-09T04:32:41+5:30
चिपळूण : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी शहरापासून ग्रामीण भागापर्यंत विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. याच धर्तीवर चिपळूण युवा सेना ...
चिपळूण : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी शहरापासून ग्रामीण भागापर्यंत विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. याच धर्तीवर चिपळूण युवा सेना तालुका अधिकारी उमेश खताते यांनी एक अनोखा सामाजिक उपक्रम राबवीत सर्वांचे लक्ष वेधले. तालुक्यातील पाच गावांना १ हजार लिटर सोडियम हायपोक्लोराइड लिक्विड परिसराची फवारणी करण्यासाठी दिले आहे.
‘माझी रत्नागिरी माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत उमेश खताते यांनी तालुक्यातील खेर्डी, कापसळ, धामणवणे, कामथे, कामथे खुर्द आदी गावांना हे फवारणी लिक्विड दिले आहे. गेले दोन दिवस या गावांना भेटी देत त्यांनी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडे हे लिक्विड दिले. जंतुनाशक या लिक्विडमुळे पाच गावांमध्ये औषध फवारणी करण्यास मदत होणार आहे. यावेळी खेर्डीचे उपसरपंच विजय शिर्के, कापसाळचे सरपंच सुनील गोरिवले, कापसाळ विभाग प्रमुख राम डिगे, युवा सेना उपतालुका अधिकारी संजय चांदे, धामणवणेचे सदस्य नितीन शिगवण, रमेश घडशी, माजी सरपंच संतोष उदेग, कामथे खुर्द सदस्या निर्मल, आयटीसेल तालुका अधिकारी मंदार निर्मल, अजित शिंदे, मुबारक सरकारे, राहुल भोसले आदी उपस्थित होते.