चिपळुणात भाजपतर्फे साहित्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:24 AM2021-06-02T04:24:35+5:302021-06-02T04:24:35+5:30
चिपळूण : येथील भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी कार्यकाळाची ७ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विविध उपक्रम राबवण्यात आले. भारतीय ...
चिपळूण : येथील भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी कार्यकाळाची ७ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विविध उपक्रम राबवण्यात आले.
भारतीय जनता पक्ष चिपळूण ग्रामीण व शहरतर्फे ही विविध सेवा कार्यरत करण्यात आली.
भाजपतर्फे येथील पोलीस कर्मचाऱ्यांना सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. तसेच शहरातील रामतीर्थ स्मशानभूमी येथे पीपीई कीट देण्यात आले. काही गरजू लोकांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच ग्रामीण भागातील वाडीवस्तींवर जाऊन मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर, शहराध्यक्ष आशिष खातू, नगरसेवक परिमल भोसले, युवा प्रदेश पदाधिकारी प्रणय वाडकर, महिला मोर्चा पदाधिकारी रोहिणी मेंगे, तालुका चिटणीस मधुकर फके, अंकुश तांबट, अनिल तांबट, तेजस सुतार उपस्थित होते.
-------------------------
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या कार्यकाळाला ७ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल चिपळूण भाजपतर्फे साहित्यांचे वाटप करण्यात आले़