श्री केदारलिंग ग्रामविकास मंडळाकडून भडकंबा गावात मास्क व सॅनिटायझरचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:29 AM2021-05-15T04:29:46+5:302021-05-15T04:29:46+5:30

साखरपा : कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असल्याने, तो रोखण्यासाठी व गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, या ...

Distribution of masks and sanitizers in Bhadkamba village by Shri Kedarling Gram Vikas Mandal | श्री केदारलिंग ग्रामविकास मंडळाकडून भडकंबा गावात मास्क व सॅनिटायझरचे वाटप

श्री केदारलिंग ग्रामविकास मंडळाकडून भडकंबा गावात मास्क व सॅनिटायझरचे वाटप

Next

साखरपा : कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असल्याने, तो रोखण्यासाठी व गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, या भावनेने श्री केदारलिंग ग्राम विकास मंडळ, मुंबई यांच्या माध्यमातून संगमेश्वर तालुक्यातील भडकंबा या गावात मास्क व सॅनिटायझरचे वाटप उपक्रम राबविण्यात आला.

श्री केदारलिंग ग्रामविकास मंडळ भडकंबा, मुंबईचे अध्यक्ष उदय बाईत, सचिव महेंद्र मोरे व खजिनदार नंदकुमार नवाले यांनी मंडळाच्या अनेक कार्यकर्त्यांशी फोनवरून संपर्क साधून, या उपक्रमाची संकल्पना सर्वांसमोर मांडली. त्याला सर्वांनीच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमातून सॅनिटायझरच्या ५०० बाटल्या व २,००० मास्क गावी पाठवून ते ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात आले. या उपक्रमासाठी मंडळाचे कार्यकर्ते प्रदीप मांडवकर यांनी विशेष मेहनत घेतली.

या सर्व साहित्याचे वाटप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सरपंच प्रतीक्षा नवाले व उपसरपंच प्रशांत उर्फ बापू शिंदे व संपूर्ण टीम यांच्या मार्गदर्शनाखाली भडकंबा गावातील प्रत्येक वाडीत करण्यात येत आहे. याचा प्रारंभ नवालेवाडी येथे करण्यात आला. या कार्यक्रमासाठी भडकंबा गावातील सर्व वाडीतील स्थानिक नागरिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या बातमीला १४ रोजीच्या शोभना फोल्डरमध्ये भडकंबा नावाने आहे.

फोटो मजकूर

श्री केदारलिंग ग्रामविकास मंडळ, मुंबई यांच्या माध्यमातून संगमेश्वर तालुक्यातील भडकंबा या गावात मास्क व सॅनिटायझरचे वाटप उपक्रम राबविण्यात आला. यावेळी गावातील ग्रामस्थ व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Distribution of masks and sanitizers in Bhadkamba village by Shri Kedarling Gram Vikas Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.